30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरमहाराष्ट्रआठ वर्षांची असल्यापासून वडिलांकडून लैंगिक शोषण; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे स्पष्टीकरण

आठ वर्षांची असल्यापासून वडिलांकडून लैंगिक शोषण; भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे स्पष्टीकरण

भाजप नेत्या आणि सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी एक खळबळजनक स्पष्टीकरण केले आहे. आठ वर्षांच्या असल्यापासून त्यांचे वडील त्यांचं लैंगिक शोषण करत होते, असा धक्कादायक दावा त्यांनी बरखा दत्त यांच्या मोजो स्टोरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने या मुलाखतीच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. त्यांच्या आईलादेखील वडील सतत मारहाण करायचे. याविषयी बोलताना आई विश्वास ठेवणार नाही, अशी लहानपणी मला भीती वाटायची, असे त्यांनी सांगितले. (I have been sexually exploited by my father)

I have been sexually exploited by my father

खुशबू सुंदर यांनी त्यांच्या बालपणीच्या दुःखद अनुभव कथन केला आहे. वडिलांनीच आपले लैंगिक शोषण केल्याचं त्यांनी सांगितले. वयाच्या आठ वर्षाच्या असल्यापासून हा घृणास्पद प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “मला वाटतं की जेव्हा एका लहान मुलाचं किंवा मुलीचं लैंगिक शोषण होतं, तेव्हा त्याला आयुष्यभर मानसिक त्रास सहन करावा लागतो.” लहानपासूनच त्यांना वडिलांच्या विकृतीचा सामना करावं लागला. त्यांच्या आईलादेखील कौटुंबिक हिंसेला सामोरे जावे लागल्याचे त्या म्हणाल्या.

माझ्या आईला भयंकर कौटुंबिक हिंसेचा सामना करावा लागला. पत्नीला मुलांना मारहाण करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे,असं माझ्या वडिलांना वाटायचे. अशा माणसासोबत माझ्या आईला संसार करावा लागला, असे खुशबू सुंदर यांनी सांगितले. खुशबू सुंदर यांनी २०१०मध्ये राजकारणात प्रवेश केला. २०२०मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नुकतीच खुशबू सुंदर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी बालपणी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

माझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास कदम यांचा ठाकरेंना इशारा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी