प्रभाकर देशमुख यांची पहिल्यांदाच जम्बो मुलाखत लय भारीने घेतली आहे(I will transform maan-khatav, Jumbo interview). प्रभाकर देशमुख हे निवृत्त IAS अधिकारी आहेत. त्यांनी गेल्या पंचवार्षिकच्या वेळी त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली होती. जयकुमार गोरे यांचा त्यावेळी निसटता विजय झाला होता. जेमतेम २५०० मतांनी त्यांचा विजय झाला होता. यावेळी पुन्हा प्रभाकर देशमुख व जयकुमार गोरे यांच्यात आमना सामना होवू शकतो. या पार्श्वभूमीव प्रभाकर देशमुख यांची लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी मुलाखत घेतली.
प्रभाकर देशमुखांचा जयकुमार गोरेंवर तीक्ष्ण वार !
तब्बल १.२० तासाची ही मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये गेल्या १५ वर्षात जयकुमार गोरे यांना १२.६२ टीएमसी हे माण – खटावच्या वाट्याला असलेले सगळे पाणी आणता आलेले नाही. अवघे ४ टीएमसी पाणी ते घेऊन येवू शकले. उरलेले पाणी वाहून गेले. हे फार मोठे पाप जयकुमार गोरे यांच्या हातून झाल्याचे प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. शिक्षण, शेती, आरोग्य, कौशल्य, संस्कृती अशा अनेकविध विषयांवर प्रभाकर देशमुख यांनी यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. जयकुमार गोरे हे माण – खटाव मतदासंघाचे विद्यमान आमदार आहेत. गेली १५ वर्षे ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी या काळात माण – खटावचा जेवढा विकास केला, त्यापेक्षा जास्त त्यांनी येथील संस्कृती बिघडविण्याचे काम केले. अभ्यासू, बुद्धिवंत, उच्च विद्याविभूषीत अशा लोकांना जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते त्रास देतात.
आमदार जयकुमार गोरे म्हणजे अहंकार, प्रभाकर देशमुखांचे टीकास्त्र