30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रIAS डॉ. राजेश देशमुख यांना राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

IAS डॉ. राजेश देशमुख यांना राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांना राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या (President Draupadi Murmu) हस्ते गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी तसेच दिव्यांग मतदारांच्या मतदार नोंदणीसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांची देशपातळीवर आज दखल घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ (Best Electoral Practices Award) प्रदान करण्यात आला. (IAS Dr. Rajesh Deshmukh Awarded by the President in Delhi)

दिल्ली येथे तेराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात निवडणूक प्रक्रीयेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकारातून पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील सुमारे अडीच हजार मोठे व लहान उद्योगांपर्यंत पोहोचून मतदार नोंदणी केली होती. आपल्या उल्लेखनीय कामांबद्दल जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना ओळखले जाते. यापूर्वी पीएम किसान योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात आले होते. तसेच सातारा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानात देखील त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याबद्दल देखील त्यांना पुरस्कार देण्यात आला होता.

अजित पवारांनी ‘या’ कारणासाठी डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर केली नियुक्ती

IAS राजेश देशमुख यांचा दणका, राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाईची कुऱ्हाड

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर ४८ हजारांवर युवकांची मतदार नोंदणी केली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी