30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रIAS अधिकाऱ्याने मानले 'आई'चे आभार!

IAS अधिकाऱ्याने मानले ‘आई’चे आभार!

ओमकार मधुकर पवार असे आयएएस झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामध्ये माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून आई थॅंक्यू असे या पोस्टमध्ये ओमकार यांनी म्हटले आहे. 

प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे अनेकांचे स्वप्न असते, त्यासाठी अनेकजण प्रयत्नशील दिसतात. दरवर्षी अनेकजण प्रशासकीय सेवेसाठी तयारी करतात, यामध्ये कोणाला यश मिळते तर कोणाला अपयश परंतु ज्यांना यश मिळते त्यांचा आनंद हा वेगळाच असतो कारण परीक्षेची खडतरता पार करून किनारा गाठलेला असतो. असंच एका तरुणाने आयएएस झाल्याचा आनंद व्यक्त करताना आपल्या यशाचे श्रेय त्यांने आईला दिले आहे. ओमकार मधुकर पवार असे आयएएस झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामध्ये माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून आई थॅंक्यू असे या पोस्टमध्ये ओमकार यांनी म्हटले आहे.

आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले ओमकार पवार यांनी त्यांच्या मिळालेल्या यशामध्ये सगळ्यांचे आभार मानण्यासाठी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. ओमकार पवार ट्विटमध्ये लिहितात, आता अधिकृत..IAS ओंकार मधुकर पवार..आयुष्यातील एका पर्वाचा अंत आणि दुसऱ्या एका जबाबदार पर्वाची सुरुवात..यासाठी सगळ्यांचे आभार यामध्ये आईने माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे तिचे सगळ्यात जास्त आभार..व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाहीत असे म्हणून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

Mantralaya: मुख्यमंत्र्यांकडे फायलींचा ढीग साचला, म्हणून त्यांनी…

Chitra Wagh : महिलांच्या सुरक्षेचे पेटंट घेतलेल्या चित्रा वाघ भंडारा बलात्कार प्रकरणी चिडीचूप

आयएएस अधिकाऱ्याने आईचे जाहीरपणे आभार व्यक्त केल्यामुळे त्यांचे सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!