30.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमहाराष्ट्रIAS Transfer: राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer: राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडणवीस सरकारने आज राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये राजेंद्र भोसले, निधी चौधरी, दिपा मुधोळ-मुंडे, राधाविनोद शर्मा, सिद्धार्थ सालीमथ या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची बदली मुंबईतील विक्रीकर खात्याच्या सह-आयुक्तपदी केली आहे. तसेच औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासक दिपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांची बदली औरंगाबाद सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी केली आहे. तर सिद्धार्थ सालीमठ यांची अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

IAS Promotion : म्हैसकर दाम्पत्यासह सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती

IAS डॉ. सना गुलवानी : पाकिस्तानातील पहिली महिला हिंदू आयएएस अधिकारी; भारतीयांना अभिमान, सिंधी समाजासाठी गौरवास्पद!

IAS योगेश म्हसे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी