30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल

पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल

टीम लय भारी

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे. तरीही विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी आवर्जून बैठकीला उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, या बैठकीच्या अनुषंगाने तीन गोष्टी माझ्या मनात होत्या. पक्ष संघटना म्हणून पुढील अडीच वर्षात आपल्याला कष्ट करायचे आहेत. मी आताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगत होतो की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आपण १९९९ साली केली. आज २३ वर्षांचा कालखंड झालेला आहे.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविषयी बोलतांना ते म्हणाले की, अनेकजण मला बोलले की, ४० मधील एक दोन अपवाद सोडले. तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्य माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले, असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल.

मी दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक मला भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली. त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत.

हे सुध्दा वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झारखंड दौरा

VIDEO : शासन-प्रशासनामुळेच ओबीसींच्या नशिबी आली उपेक्षा

राजकीय पक्षांना चपराक; ओबीसी आरक्षणाशिवाय होणार निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाकडून निर्देश

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी