34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रदोन डोक्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण घोषणा

दोन डोक्यांच्या सरकारच्या महत्त्वपूर्ण घोषणा

टीम लय भारी

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या दोन डोक्यांच्या सरकारने आज महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. बंड शमल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर 15 दिवस झाले तरिही मंत्री मंडळाचा विस्तार झाला नाही. त्यामुळे राज्यातले सगळे निर्णय केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे घेतात. त्यामुळे हे नवे सरकार दोन डोक्यांचे सरकार आहे, अशी प्रतिक्रया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.

आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या असे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या कॅबिनेटमध्ये कोणते मंत्रीगण उपस्थित होते. हे मात्र समजलेले नाही. कारण मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही.आजच्या बैठकीत काही घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्रात पेट्रोल 5 रुपये प्रती लिटर स्वस्त, तर डिझेल 3 रुपये प्रती लिटर स्वस्त करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

तसेच महाराष्ट्रात लवकरच 400 शहरांमध्ये अमृत अभियानाला सुरुवात होणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र टप्पा दोन अंतर्गत ही योजना राबविणार आहे. नगर विकास विभागाकडून ही योजना राबविली जाणार आहे. अमृत अभियानामध्ये पाणी पुरवठा आणि मलनिःस्सारण, सांडपाण्याचा पुर्नवापर, जलसाठयांचे पुर्नज्जीवन करणे आदी विषयांवर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्पयात 44 शहरांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. आता 400 शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. अमृत योजनेसाठी केंद्र सरकार अनुदान देणार आहे. 90 टक्के ग्रॅन्डच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे.

राज्यात स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. तसेच नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगरध्यक्षांची निवडणूक थेट पध्दतीने होणार आहे. राज्यातील सरपंचाची निवड थेट ग्रामपंचायतीमधून होणार आहे. बाजार समितीमधील मधील सदस्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार आहे. तसेच 2018 मधील पुरग्रस्तांच्या निधी वाटपाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे जण राज्याचा गाडा हाकत आहेत. राज्यात अतिवृष्टी सुरु आहे आशा वेळी मंत्रालय ठप्प आहे. कामकाज सुरु नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता बंडानंतर रामभरोसे जगत आहे.

हे सुध्दा वाचाः

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

ब्रेकिंग ! महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल स्वस्त

मुंबई पोलिसांच्या ‘मुस्कान’ अभियानामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आले हसू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी