29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रFestival: महाराष्ट्रात बैलांबरोबरच गाढवांचा पोळा देखील साजरा करतात

Festival: महाराष्ट्रात बैलांबरोबरच गाढवांचा पोळा देखील साजरा करतात

महाराष्ट्रामध्ये पोळयाचा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाद्रपद अमावास्येला साजरा केला जातो. खरं तर बैलांचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा मराठी मातीतल्या मराठी माणसांसाठी साजरा केला जाणारा सण आहे.

महाराष्ट्रामध्ये पोळयाचा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाद्रपद अमावास्येला साजरा केला जातो. खरं तर बैलांचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो. हा मराठी मातीतल्या मराठी माणसांसाठी साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात ग्रामीण भागात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलाला नदीवर नेऊन अंघोळ घातली जाते. त्यानंतर त्याला सजवले जाते. त्याला गोडधोड असे पुरण पोळीचे जेवण दिले जाते. या दिवशी शेतीचे काम बंद असते. या दिवशी त्याच्या शरीराला हळद आणि तेलाने शेकले जाते. त्याला ‘खांड शेकणे’ असे म्हणतात. त्यानंतर पाठीवर नक्षीकाम केलेली झूल घातली जाते.

सर्वांगावर गेरुचे ठिपके काढले जातात. शिंगांना कलर लावला जातो. गळयामध्ये कवड्यांची किंवा घुंगरांची माळ घातली जाते. नवीन वेसण घातली जाते. नवा कासरा घातला जातो. त्याला खायला गोड पुरणपोळी तसेच चांगले अन्न द‍िले जाते. घरातील सुवासिनी बैलांना ओवाळतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये बैल सजवण्याची एक प्रकारे स्पर्धा असते. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याला सजवतात. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजत गाजत देवाच्या दर्शनासाठी आणल्या जातात. अनेक ठिकाणी मारुतीच्या देवळासमोर आणले जातात.

या ठिकाणी साजरा करतात गाढवांचा पोळा सण :

अमरावतीमध्ये गाढवांचा पोळा सण साजरा केला जातो. पोळयाच्या दिवशी अमरावतीमध्ये गाढवांची पूजा केली जाते. गाढवांना सजवण्यात येते. घरोघरी पूजा केली जाते. बैलांप्रमाणेच या दिवशी गाढवाला कोणतेही काम करु दिले जात नाही. वर्षभर केलेल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. आजचा दिवस हा गाढवांच्या सन्मानाचा दिवस असतो. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील रासेगावमध्ये हा सण अतिषय उत्साहात साजरा केला जातो. गाढवांना देखील पुरणपोळी, कुरडया, पापड, भजीसारखे स्वाद‍िष्ट पदार्थ खायला दिले जातात. बैलांप्रमाणेच गाढवांशी देखील प्रेमाने वागतात.

हे सुद्धा वाचा :

International ‘Dog’ Day : इंटरनॅशनल ‘डॉग’ डे म्हणजे कुत्र्यांच्या प्रामाण‍िक पणाचा गौरव

Ganeshotsav 2022 : बाप्पाची पूजा करा ‘या’ शुभ मुहूर्तावर

Ashtavinayak Darshan : अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती’ रांजणगाव’चा महागणपती

अधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. बहूतेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आले आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहे. शिवाय बैलांची निगा राखणे अलिकडील अनेक तरुणांना आवडत देखील नाही. काळ बदलला आहे. त्यामुळे अंग मेहनतीची कामे करण्यास कोणी धजावत नाही. शिवाय शेती करण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. अनेकांनी शेतजमीन ब‍िल्डरना विकल्या आहेत. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहे.

तसेच बैलगाडी देखील काळाच्या ओघात बंद पडत चालली आहे. त्यामुळे बैलांचा वापर कमी झाला आहे. सुमारे 4 दशकांपूर्वी पाण्याची मोट चालवण्यासाठी तसेच रहाट चालवण्यासाठी बैलाचा उपयोग केला जात होता. त्याचबरोबर बैलगाडीसाठी बैलांचा वापर मोठयाप्रमाणात केला जात होता. नांगरासाठी बैलांचा वापर मोठया प्रमाणात केला जात होता. आता बदलत्या जिवनशैलीमुळे या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत हे मात्र खरे !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी