मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याच जाहीर केलं आहे. येणाऱ्या नवीन वर्षांत ते आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे सांगत त्यांनी उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. “सरकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आंदोलन होईल असे म्हणत मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. त्यांनी राज्यभरातील मराठ्यांना अंतरवली-सराटील एकत्र जमण्याच आवाहन केलं आहे. (In the new year, Manoj Jarange will sit on fast to death again)
अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं आहे. जगात मराठ्यांच्या एकजुटीला तोड नव्हती तसाच आता एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. (In the new year, Manoj Jarange will sit on fast to death again)
पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, कुठल्याही अन्य गावात साखळी उपोषण होणार नाही, मराठ्यांनी त्यांची सर्व ताकद अतरवली सराटीतच दाखवून द्यायची आहे” असं म्हणाले. महत्त्वाच म्हणजे यावेळी आमरण उपोषण फक्त अंतरवली सराटीतच होईल. मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात स्थगित केलेलं उपोषण आंदोलन पुन्हा सुरु करतोय. सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, त्याला एक वर्ष पूर्ण होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. (In the new year, Manoj Jarange will sit on fast to death again)
आमची एकजूट कायम असेल…
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी पुन्हा एकदा आपल्या सात ते आठ मागण्यांचा पुनरुच्चार करत मराठ्यांची एकजूट कायम असल्याचं सांगितलं. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. “मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. भविष्यातही अनेक प्रश्न असल्याने मराठ्यांची एकजूट कायम राहणार आहे. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.