27 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रJalna IT Raid : आयकर विभागाने जालन्यातून कारखानदारांकडून जप्त केले कोटी रुपयांचे...

Jalna IT Raid : आयकर विभागाने जालन्यातून कारखानदारांकडून जप्त केले कोटी रुपयांचे घबाड

जालना जिल्ह्यात लोखंडी गजाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जालन्यात स्टीलचे कारखाने अधिक आहेत. याच स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) धाड टाकण्यात आली आहे. आयकर विभागाकडून जालन्यातील चार मोठ्या कारखानदारांवर हि कारवाई करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात लोखंडी गजाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यामुळे जालन्यात स्टीलचे कारखाने अधिक आहेत. याच स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर आयकर विभागाकडून (Income Tax Department) धाड टाकण्यात आली आहे. आयकर विभागाकडून जालन्यातील चार मोठ्या कारखानदारांवर हि कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये सुमारे ५८ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ३२ किलो सोन्याचे दागिने, मोती, हिरे ज्यांची एकूण किंमत ३०० कोटी आहे. तसेच बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह काही महत्वाचे दस्तऐवज देखील आयकर विभागाने जप्त केले आहेत. आयकर विभागाकडून फिल्मी स्टाईलमध्ये ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात जप्त करण्यात आलेली रक्कम मोजायला आयकर विभागाला तब्बल १३ तास लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या आयकर विभागाच्या पथकाला जालना मधील मोठ्या स्टील कारखानदारांनी त्यांच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न मिळविल्याचे तसेच ते उत्पन्न पूर्णतः रेकॉर्डवर न आणल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या व्यावसायिकांनी प्राप्तिकर बुडविल्याचा संशय आयकर विभागाला आला होता. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच नाशिक येथील आयकर विभागाच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारखानदारांच्या कार्यालयांवर आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले.

१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह १२० पेक्षा अधिक कर्मचारी चारचाकी वाहनातून जालन्यात पोहोचले. त्यानंतर हे धाडसत्र सुरु करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे आयकर विभागाच्या पथकाने फिल्मी स्टाईलने ही कारवाई केली. एकाच वेळी वेगवेगळ्या तयार करण्यात आलेल्या पाच पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने या कारवाईत वापरलेल्या गाड्यांवर विविध प्रकारचे लग्नाविषयीचे स्टिकर लावण्यात आले होते. ज्यामुळे या गाड्या कोणच्यातरी लग्नासाठी आल्या असल्याचे लोकांना वाटले.

हे सुद्धा वाचा

Amol Mitkari : रवी राणा यांना नव्याने ‘देवेंद्र चालीसा’ वाचण्याची गरज, अमोल मिटकरींचा टोला

Comedian Raju Srivastav : लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Eknath Shinde Cabinet decision: शिंदे सरकारचा निर्णय, शेतकऱ्यांना दुप्पट मदत; ‘मेट्रो ३’चा खर्च ३३ हजार कोटी!

दरम्यान, या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाने सुरुवातील कारखानदारांच्या कार्यालयावर आणि ते राहत असलेल्या घरी छापे टाकले. पण या कारवाईमध्ये पथकाला सुरुवातीला काहीच आढळून आले नाही. म्हणून आयकर पथकाने या कारखानदारांच्या शहराबाहेर असलेल्या फार्महाऊसकडे मोर्चा वळवला. त्या फार्महाऊसवर मात्र पथकाला विविध ठिकाणी रोख रक्कम ठेवल्याचे आढळून आले. कपाटाच्या खाली, बिछान्यांमध्ये आणि अडगळीतील काही पिशव्यांमध्ये आयकर विभागाच्या पथकाला रोकड सापडली.

या कारवाईमध्ये ज्या कारखानदारांवर कारवाई करण्यात आली, त्यातील तिघांकडे सोन्याची बिस्किटे, हिरे, नाणी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आढळून आल्याची माहिती आयकर विभागाच्या पथकाकडून करण्यात आली आहे. तसेच या व्यावसायिकांकडे असलेली इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आयकर विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी