27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमहाराष्ट्रIND vs NZ 3rd ODI : टीम इंडियाच्या सहा विकेट; हार्दिक पांड्या,...

IND vs NZ 3rd ODI : टीम इंडियाच्या सहा विकेट; हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर मैदानावर

इंदूर येथील होळकर स्टेडीयमवर आज (मंगळवार दि. 24) (IND vs NZ 3rd ODI) भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेतील अखेरचा सामना होत आहे. या मालिकेतील सलग दोन सामने जिंकून भारतीय संघ आघाडीवर आहे. सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि रोहीत शर्मा या दोघांनी आपले शतक झळकवले. शुभमन 112 धावा करुन बाद झाला. तर रोहीत शर्मा 101 धावा केल्या. त्यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहली आणि इशान किशन यांनी म्हणावी तशी खेळी केली नाही. इशान किशन, विराट कोहली नंतर सुर्यकुमार यादव आणि वॉशिंगटन सुंदर देखील बाद झाले असून 44 षटकांमध्ये सहा बाद 322 धावा पूर्ण केल्या आहेत. (IND vs NZ 3rd ODI : Six wickets for Team India; Hardik Pandya, Shardul Thakur on the field)

विराट कोहलीने 27 चेंडूमध्ये 36 धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर इशान किशन देखील 24 चेंडूत 17 धावा करुन बाद झाला. यावेळी भारतीय संघाने चार बाद 284 धावा केल्या होत्या. इशान किशन नंतर सुर्यकुमार यादव मैदानात आला. सुर्यकुमार याने नऊ चेंडूमध्ये 14 धावा काढल्या आणि तो बाद झाला. हार्दिक पांड्या सध्या मैदानात खेळत आहे. वॉशिंग्टन सुंदर देखील 14 चेंडूमध्ये 9 धावा करुन बाद झाला. यावेळी भारतीय संघाने सहा बाद 313 धावा केल्या होत्या. सध्या शार्दुल ठाकुर देखील मैदानात आहे.

आज भारतीय संघ न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात देखील पराभूत करण्याच्या तयारीत आहे. असे झाल्यास भारतीय संघ आयसीसी एकदीवसीय संघांच्या क्रमवारीमधअये नंबर वनवर होणार आहे. इंदूरचे होळकर स्टेडियम भारतीय संघासाठी या आधी तसे लकी ठरलेले आहे. भारतीय संघाने या स्टेडियमवर झालेले सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लड, वेस्टइंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेच्या संघांचा पराभव केला आहे. आज देखील भारतीय संघाने फंलदाजी करताना आपली जोरदार खेळी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाने ही मालिका जिकंल्यास एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघ अव्वल ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा 

‘गांधी गोडसे:एक युद्ध’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना धमक्या; मुंबई पोलिसांना लिहिलं पत्र

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघाची नंबर वनकडे वाटचाल; शुभमन, रोहीत शर्मा बाद, दोघांनीही झळकवले शतक

अभियांत्रिकीच्या परीक्षा रद्द; पुणे विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप

असा आहे भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदिप यादव, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.

असा आहे न्युझीलंडचा संघ
डेवन कॉन्वे, फिन ऐलेन, हेनरी निकल्स, डेरिस मिचेल, टॉम लेखम (कर्णधार) ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅँटनर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेयर टिकसन

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी