31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रबांग्लादेश दौऱ्याची लगबग सुरू; 4 डिसेंबरला रंगणार पहिला सामना

बांग्लादेश दौऱ्याची लगबग सुरू; 4 डिसेंबरला रंगणार पहिला सामना

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आता बांगलादेशला रवाना होणार आहे. वास्तविक, 4 डिसेंबरपासून भारतीय संघ 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला पोहोचत आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. ज्याचा पहिला सामना रविवार 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

टी20 विश्वचषकात पराभव पत्कारावा लागल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाने पुढील वर्षी होणाऱ्या 2023 वनडे विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी होणारा आयसीसी वनडे विश्वचषक भारतात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्ल्डकपची तयारी खऱ्या अर्थाने बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेपासून होणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया आता बांगलादेशला रवाना होणार आहे. वास्तविक, 4 डिसेंबरपासून भारतीय संघ 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेशला पोहोचत आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. ज्याचा पहिला सामना रविवार 4 डिसेंबर रोजी होणार आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल हे सर्व खेळाडू टीम इंडियात या दौऱ्यासाठी परतत आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन या खेळाडूंना या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांना न्यूझीलंड दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आता या तिन्ही खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यामुळे कोणाला संघाबाहेर रहावे लागणार हे पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे सरकारचे ‘खोके’ नागपूरला जाणार

आता तृतीयपंथींही पोलीस होणार; मॅटने दिले नवे आदेश

…तर भाजपचे 10 खासदारही निवडून येणार नाहीत, संजय राऊतांचे आव्हान

भारत-बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना 7 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत-बांगलादेश मालिकेतील दोन एकदिवसीय सामने ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवले जातील, तर तिसरा सामना चितगावमधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल. याशिवाय, दोन्ही संघांमधील 2 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 ते 18 डिसेंबर दरम्यान चितगाव येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाईल. या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ढाका येथे 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळवला जाईल.

बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी