31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रIndependence Day | माण खटावमध्ये आहे देशातील पहिली ग्रामपंचायत (भाग १)

Independence Day | माण खटावमध्ये आहे देशातील पहिली ग्रामपंचायत (भाग १)

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले(India got independence on 15 August 1947). म्हणून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु भारतात असाही एक मोठा भाग आहे की, तिथे देशाच्याही अगोदर म्हणजे १९३९ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले(India got independence on 15 August 1947). म्हणून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु भारतात असाही एक मोठा भाग आहे की, तिथे देशाच्याही अगोदर म्हणजे १९३९ मध्ये स्वातंत्र्य मिळाले होते. एवढेच नव्हे तर त्यावेळी तिथे ग्रामपंचायत सुद्धा स्थापन करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळालेल्या या स्वतंत्र संस्थानासाठी महात्मा गांधी(mahatma gandhi) यांनी संविधान लिहिले होते.

Azadi Ka Amrit Mahotsav : भारताच्या स्वातंत्र्यद‍िनाची तारीख 15 ऑगस्ट ठरवण्याचे कारण

भारतात लिहिले गेलेले हे पहिले संविधान होते. ही कहाणी आहे, औंध संस्थानाची. त्यावेळचे महाराज बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या संस्थानाला स्वातंत्र्य दिले होते. युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी हे संस्थानचे राजदूत होते. त्यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये संस्थानचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे लोकशाही, साम्यवादी, समाजवादी अशा विविध विचारसरणींचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’च्या निर्मात्याने केला मोठा खुलासा, सांगितले अंकिता लोखंडेने किती घेतले मानधन

त्यामुळे संस्थानाला स्वातंत्र्य द्यायचे आणि लोकशाही स्थापन करायची, अशी मानसिकता आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांची झाली होती. त्यांच्या या विचारातूनच त्यांचे वडिला बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी औंध संस्थानाला प्रतिनिधीत्व देवून टाकली. ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी १५ ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थानला भेट दिली. औंध संस्थानातील अनेकविध प्रकारची माहिती त्यांनी जाणून घेतली. या ठिकाणचे रहिवाशी व निवृत्त शिक्षक जयवंत खराडे यांनी संस्थानचा इतिहास उलगडून दाखवला. विशेष म्हणजे, हे स्वातंत्र्य देताना लोकशाही पद्धतीने स्वातंत्र्य देण्यात आले होते. महात्मा गांधींनी जी ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली होती, त्या संकल्पनेनुसार संस्थानचा कारभार सुरू करण्यात आल्याचे जयवंत खराडे यांनी यावेळी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी