33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रपेट्रोल डिझेल स्वस्त झाले ! बघा...आता...काय काय महाग झाले.....

पेट्रोल डिझेल स्वस्त झाले ! बघा…आता…काय काय महाग झाले…..

टीम लय भारी

मुंबई: सामान्य माणसाला महागाईमुळे जगणे मुश्किल झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वयंपाकाचा गॅस महागला. आता जीएसटीमुळे अन्नधान्य महाग होणार आहे. नुकतीच राज्य सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त केल्याची घोषणा केली होती. मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. कारण आता अन्नधान्यावर जीएसटी कर लावण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे महागाईने कंबरडे आणखी मोडणार आहे. 18 जुलैपासून नवे दर लागू होणार आहेत. 28 -29 जुन रोजी जीएसटी काउंसिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जीएसटी काउंसिलने सामान्य माणसाच्या खिशाला चटका दिला आहे. यामध्ये पाकिट बंद पदार्थ, लेबल लावलेले पदार्थ, मच्छी, दही, पनीर, लस्सी, शहद,सुका मखाणा, सुका सोयाबीन, वटाणा, गहू,अन्नधान्य मुरमुरे यांच्यावर 5 टक्के कर लावण्यात येणार आहे. ट्रेटा पॅक, बॅंकेकडून चेक केले जाणारी सुविधा, नकाशे तसेच प्रती दिन 1000 रुपये भाडयाने दिल्या जाणारे हाॅटेलचे रुम देखील जीएसटी मधून वाचले नाहीत.

तसेच रुग्णालयातील आयसीयु सुविधा व्यतिरिक्त सुविधांसाठी जीएसटी लागू होईल. शाई, पेन्सिल, शार्पनर महाग होणार आहे. तसेच एलईडी बल्ब डाॅईंग आणि मार्किंग करण्याचे प्रोडक्टसवर 18 टक्के तर सोलर वाॅटर हिटरवर 12 टक्के जीएसटी लागेल. पाॅलिश केलेल्या हिरा 0.25 वरुन 1.5 टक्के जीएसटी दयावा लागेल. एलईडीवर 12 ऐवजी 18 टक्के जीएसटी लागेल. तर पुर्वोत्तर राज्यामधील विमान प्रवासाला सुट दिली आहे. केवळ इकाॅनाॅमी क्लाससाठी ही सूट आहे. रोपवे तसेच यात्रेकरुंच्या वाहतूकीला 18 टक्क्यांवरुन 5 टक्के अधिक वाढ करण्यात आली आहे. ट्रक वाहतुकीवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.

हे सुध्दा वाचा:

विमान कंपन्यांचे दुर्लक्ष; पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा उतरवले विमान

यशाचे श्रेय घेण्यात ‘अमित शाह’ हुशार

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी