30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रशिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही - शरद पवार

शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही – शरद पवार

टीम लय भारी

पुणेः अनेक वर्षांपासून बाबासाहेब पुरंदरे विरुध्द शरद पवार हा वाद सुरु आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहावरुन हा वाद आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यनंतर देखील हा वाद शांत झाला नाही. आज एका कार्यक्रमात शरद पवारांनी पुन्हा एकदा बाबासाहेंब पुरंदरेंवर टीका केली. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश होतो, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. माझ्या मते शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही, असे वक्तव्यही शरद पवार यांनी केले आहे.

‘शिवचरित्र आणि विचार प्रवाह’  या श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचे पुण्यामध्ये शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला कोल्हापुरचे शाहू छत्रपती जयसिंगराव पवार आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवचरित्राबाबत हे वक्तव्य केले आहे. श्रीमंत कोकाटेंनी खरा इतिहास लिहिलाय,असे शरद पवार यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे. संसदेचे अधिवेशन संपले की, मी या इतिहास संशोधकासोबत बैठक घ्यायला तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वस्तुनिष्ठ इतिहास समोर येण्यासाठी प्रयत्न करायला तयार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यात वादविवाद रंगण्याची शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले की, इतिहासकारांनी शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती दिली. तर काहींनी धादांत खोटी माहिती दिली. पण श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य होते. पण शिवाजी महाराजांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांच राज्य कधी भोसल्यांचे राज्य झाले नाही. ते रयतेचे राज्य म्हणूनच ओळखल गेले. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘कुळवाडी भूषण’ असा केला.

ज्यांचा मातीशी संबंध आहे असा, शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा. संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडले. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरेंएवढा अन्याय कोणीच केला नाही. रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते का? याबाबत मी जास्त बोलू इच्छित नाही. महाराष्ट्र सरकार आधी दादोजी कोंडदेव क्रिडा पुरस्कार द्यायचे, पण 2008 साली समिती सरकारने एक स्थापन केली. दादोजी कोंडदेव हे गुरु होते, का याचा अभ्यास केला गेला. त्यातून असे समोर आले की दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु किंवा मार्गदर्शक नव्हते. तर जिजाबाई मार्गदर्शक होत्या.

हे सुध्दा वाचा:

ममता बॅनर्जीचे दोन ‘मंत्री’  ईडीच्या रडारवर

‘तो पुन्हा येईल’

भगवा झेंडा काढल्याने शिरढोणकरांनी दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!