31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रIPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे...

IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…

फोन टॅपिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रश्मी शुल्का (Rashmi Shukla) यांची पोलीस महासंचालकपदी (Director General of Police) नियुक्ती व्हावी यासाठी थेट दिल्लीतूनच हालचाली सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या केंद्र सरकारमधून रश्मी शुक्ला यांच्यासाठी केंद्र सरकारमधून प्रयत्न सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. रश्मी शुक्ला सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. शुल्का यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.
सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठे राजकीय नाट्य घडले होते. शिवसेनेने भाजपशी फारकत घेत राज्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवत कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेने हातमीळवणी करत सरकार स्थापन केले होते. दरम्यान या राजकीय घडामोडींच्या काळात महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर यामध्ये आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा सहभाग असल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदासाठी पात्र ठरल्या नव्हत्या. दरम्यान राज्यात सत्तांतर घडून आल्यानंतर आता राज्य सरकारकडून रश्मी शुक्लांना दिलासा मिळाला आहे. आयपीएस रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे.

हे सुद्धा वाचा :
T20 world Cup : पावसाचा इंग्लंडला दणका! टी20 विश्वचषकातील पहिला पराभव आयर्लंडकडून
Mumbai News : दिवाळीची मिठाई खरेदी करताना लागला 2.4 लाखांचा चुना! मुंबईतील घटना
Bigg Boss Marathi : मिसेस उपमुख्यमंत्री ‘बिग बॉस मराठी’च्या घरात
— गोपनीय अहवाल झाला होता व्हायरल
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यांनंतर फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अनोळखी व्यक्तीविरोधात शासकीय गुपिते अधिनियमान्वये (ऑफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्ट) गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले आणि त्याची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी