29 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरमहाराष्ट्रविरोध होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला...

विरोध होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

राष्ट्रवादीत बंड केल्याने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झालेल्या अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात करण्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले होते. इरसाल वाडी येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या वाढदिवस समारंभवर टीका केली. त्यामुळे अजित पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यातील इरसालवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात.

हे सुद्धा वाचा:

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिली भेट

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना सरकारी पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

सुप्रिया सुळेंना मुलगी रेवतीबद्दल प्राऊड फिलींग !

इरसालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इरसालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी