26 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरमहाराष्ट्रइर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिली भेट

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त गावाला ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिली भेट

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावांमध्ये आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन पाहणी केली. काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरम्यान घडलेल्या या घटनेची दखल घेत त्यांनी सकाळीच येथे भेट देत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांना धीर दिला. या कठीण प्रसंगी शिवसेना पक्षासह मी स्वतः तुमच्या सोबत आहेत. सद्य परिस्थितीत या दुर्घटनेतून वाचवलेल्या लोकांची काळजी घेणे हीच आपली प्राथमिकता आहेत. त्यासाठी शासन तसेच आपत्तीग्रस्त टीम सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे यावेळी ते म्हणाले.

खालापूर येथील इर्शाळगड वाडीवर दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 98 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. येथे 50 ते 60 आदिवासींच्या घरांची मोठी वस्ती होती. इर्शाळवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. वसाहतीत आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. सध्या प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचावपथकाला पायी चालत जावे लागत आहे. एनडीआरएफच्या 4 टीम घटनास्थळी पोहोचल्या असून स्थानिक प्रशासनासह ते बचावकार्य करत आहेत.

हे सुद्धा वाचा:

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना सरकारी पाच लाखांची मदत, जखमींवर मोफत उपचार

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू , प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

सुप्रिया सुळेंना मुलगी रेवतीबद्दल प्राऊड फिलींग !

दरम्यान, आज सकाळीच त्यांनी घटनेची माहिती घेत सोशल मीडियाद्वारे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदना प्रकट केल्या. तसेच यामध्ये जखमी झालेल्या ग्रामस्थांना योग्य उपचार मिळत आहेत का याची माहिती घेतली. दरड कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी