करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील आहेत(It is our mistake that Sanjaymama Shinde was made MLA). ते मतदार संघात कधीही येत नाहीत. करमाळा तालुक्यात तर ते कधीच कोणाला भेटले नाहीत, सामान्य लोकांसाठी ते उपलब्ध नसतात. करमाळा जेऊर पासून उज्वल धरण खूप जवळ आहे. पण या धरणाचे पाणी आम्हाला मिळत नाही. यापूर्वी नारायण आबा पाटील हे आमदार होते. नारायण आबा पाटील यांनी दहिगाव सिंचन योजना यशस्वीपणे राबवल्या त्याचा फायदा परिसराला झाला या ठिकाणी गेल्या वर्षापासून पाऊस नाही.
एकनाथ शिंदे कुठल्याच बाजूने मुख्यमंत्री वाटत नाहीत
अन विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आमच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सुद्धा येत नाहीत संजय मामा शिंदे महिन्यातील एक दिवस मतदार संघात असतात उरलेले कालावधी ते मतदार संघाच्या बाहेरच असतात. त्यांना समस्या सांगणे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे खूप अवघड काम आहे. रश्मी बागल यांचा आदिनाथ सहकारी कारखाना बंद पडला. दुसरा मकाई साखर कारखाना सुद्धा बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नारायण आबा पाटील हा सामान्य लोकांसाठी राबणारा माणूस आहे. सामान्य लोकांसाठी ते सदैव उपलब्ध असतात. सामान्य लोकांचे गाऱ्हाणे ते ऐकून घेतात. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत उपलब्ध असतात. त्यांचे जीवन त्यांनी सामान्य लोकांना समर्पित केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले काश्मीरला; दिली श्रीनगर येथील गणेशोत्सव मंडळास भेट