33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रVIDEO : जम्मू-काश्मीरमधील मुलींनी सुरेल आवाजात गायले 'जय जय महाराष्ट्र माझा' !

VIDEO : जम्मू-काश्मीरमधील मुलींनी सुरेल आवाजात गायले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ !

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… (Jai Jai Maharashtra maja) हे कविवर्य राजा बढे यांनी यांनी लिहीलेले गीत नुकतेच राज्य सरकारने महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्विकारले आहे. एका कार्यक्रमात जम्मू काश्मीरमधील शहीद जवान आणि पोलीस बांधवांच्या मुलींनी (Jammu and Kashmir Girls) अत्यंत सुरेल आवाजात हे गीत गात महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरच्या सलोख्याचे दर्शन घडविले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या मुलींचे कौतुक करत या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (Jammu and Kashmir Girls sang the song ‘Garja Maharashtra Maja’!)

चंद्रकांत पाटील यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, राज्य शासनाने घोषित केलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे राज्यगीत ‘सरहद’ संस्थेतील जम्मू-काश्मीरमधील शहीद जवान आणि पोलीस बांधवांच्या मुलींच्या मुखातून ऐकण्याचं भाग्य लाभलं. त्यांनी गायलेलं हे राज्यगीत ऐकताना अभिमान वाटला. भाषेचा अडसर दूर करत साकार झालेली विविधतेतील एकताही दिसली.

जम्मू काश्मीर मधील या मुली जयजय महाराष्ट्र माझा हे गीत अत्यंत उत्साहाने गात असून त्यांच्या या गाण्याला उपस्थितांनी टाळ्यावाजवून उत्स्फुर्तपणे दाद दिल्याचे देखील या व्हिडीत दिसते. अत्यंत सुरेल आवाजात गायलेले हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या मुलींचे कौतुक करत त्यांच्या या गीतामधून विविधतेतील एकता दिसली अशी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

सत्यजीत तांबे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कामाचा माणूस ओळख सिद्ध केली !

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुनावणी; खटला सात सदस्यांच्या खंडपीठासमोर जाणार?

सरदह ही पुण्यातील सामाजिक संस्था असून ती जम्मू-काश्मीरमधील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करते. जम्मू काश्मीर मधील लोकांना मदत करणे, तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, राहण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा विविध स्तरावर सरहद संस्था काम करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी