31 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरमहाराष्ट्रबदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, 'जवान' मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट

बदला घेण्यासाठी मी शाहरुख सोबत काम केलं, ‘जवान’ मधील या कलाकाराचा गौप्यस्फोट

अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. शाहरुखसोबत दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. ‘जवान’ चित्रपटात विजय सेतुपतीने नकारात्मक भूमिका साकारलीये. व्हिलन बनून मला थेट शाहरुखशी बदला घ्यायचा होता, असा गौप्यस्फोट विजय सेतुपतीनं केला.

मी जिच्यावर प्रेम केलं तिनं शाहरुखवर प्रेम केलं. मला माझं प्रेम मिळालं नाही. मी चित्रपट स्वीकारून शाहरुखवरचा राग काढला, असं विनोदी उत्तर विजय सेतुपतीनं दिलं. शाळेत मला एक मुलगी आवडायची. तिला शाहरुख आवडायचा. माझ्या प्रेमाला तिच्याकडून प्रतिसादच लाभला नाही. माझं प्रेम अपूर्ण राहिलं. बऱ्याच वर्षानंतर मला शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळाली. शाहरुखला त्रास देणारी नकारात्मक भूमिका स्वीकारल्यामुळे पहिलं प्रेम गमावण्याचा बदला मला घेता आला, असं विजय सेतूपतीने विनोदाने सांगितलं.

हे ही वाचा 

दीपिका पाडूकोणला ‘या’ कलाकारानं पाठवला मेसेज, दीपिकाची रिएक्शन काय?

सनी लिओनीनेही साजरा केला रक्षाबंधन! पहा, कोणाला बांधली राखी?

शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीझ; कमल हसन काय म्हणाला ?

शाहरुखला याबाबत विचारताचं आपल्या मिश्किलशैलीतच त्यांना उत्तर दिलं. विजय सेतुपती यांनी जवान चित्रपटातील माझ्या कामाबाबत अद्यापही अभिनंदन केले नाही. विजय सेतुपती यांनी शाळेतला क्रश माझ्यामुळे गमावल्याचं माझ्या कानावर आलं. त्यांनी बदला खुशाल घ्यावा. पण ती मुलगी माझीच राहील, असं सांगत विजय सेतुपती यांचा चिमटा घेतला. ‘जवान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये विजय सेतुपतीचे जास्त सिन्स ठेवण्यात आले आहेत. याकरिता शाहरुखचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी