आमदार जयकुमार गोरे यांची गु़ंडगिरी, त्यांनी केलेले गैरप्रकार, माण – खटावमधील जयकुमार गोरे यांची दहशत याला न जुमानता ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात ते निर्भिडपणे आपले पत्रकारितेचे काम करीत आहेत(Jayakumar Gore’s activist threatens editor Tushar Kharat). रविवारी तुषार खरात थेट मुंबईमधून माण खटाव विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यानी तुषार खरात यांना धमकावणे सुरू केले आहे. सोमनाथ बुधे याने तर केलेली वक्तव्ये खळबळजनक आहेत. तुम्ही आमच्या विरोधात महिलांसारख्या अत्याचाराची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करा, देवेंद्र फडणवीस आमचेच आहेत, असे विधान केले आहे. कोरोना काळाच्या दरम्यान एका जाहीर कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी रामाचा उल्लेख रावण असा केला होता. ती बातमी ‘लय भारी’ने यू ट्यूब व फेसबूकवर दाखविली होती.
Jaykumar Gore | सतोबा देवस्थानच्या पुजाऱ्याचे ‘खतरनाक’ भाकीत, जयकुमार गोरे पडणार |
त्यावर कमेंटसमध्ये त्या महिला अँकरवर सोमनाथ बुधे व इतर कार्यकर्त्यांनी घाणेरड्या शब्दांत शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर ‘लय भारी’ने सोमनाथ बुधे याला ब्लॉक केले होते. त्यानंतर त्याने आज +91 98348 33023 या मोबाईलवरून तुषार खरात यांना फोन केला. ट्रू कॉलरवर Jaykumar Gore असे नाव आले. त्यामुळे तुषार खरात यांनी फोन उचलला. पण फोनवर प्रत्यक्ष सोमनाथ बुधे असे नाव होते. त्यांनी बोलताना भाजपला व आमदार जयकुमार गोरे यांना अडचणीत आणणारी विधाने केली आहेत. आमच्या गावात आमची मुलाखत घ्यायला या, असे हा सोमनाथ बुधे दम देवून सांगत आहे. चार वर्षांपूर्वी तुम्ही मला ब्लॉक का केले असा जाब तो तुषार खरात यांना विचारत आहे. त्यावर तुम्ही महिला अँकरवर गलिच्छ शब्दांत टीका करीत होता. आमच्या महिला पत्रकार तुमच्यावर गुन्हा दाखल करणार होत्या,
Shahajibapu Patil | Jaykumar Gore | जयकुमार गोरेंचे नाव घेताच शहाजीबापू पाटलांचे समर्थक खवळले
असे तुषार खरात म्हणाले. या प्रकरणाचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू का, असे तुषार खरात यांनी विचारले. त्यावर ‘खुशाल तक्रार करा, देवेंद्र फडणवीस हे आमचेच आहेत, असे हा सोमनाथ बुधे निर्लज्जपणे बोलत आहे. म्हणजे आम्ही काहीही केले तरी देवेंद्र फडणवीस आमच्या मागे ठाम उभे आहेत, असा आत्मविश्वास त्याला असल्याचे दिसत आहे. २२ मिनिटांची ही क्लिप आहे (दुर्दैवाने रेकॉर्डिंग करीत असताना काही भाग टेक्निकल प्रॉब्लेममुळे रेकॉर्ड होवू शकला नाही. त्यात *जयकुमार गोरे हे गुंडांचे गुंड* आहेत, हा भाग सेव्ह झाला नाही). पण उरलेली २२ मिनिटांची क्लिप सुद्धा खळबळ उडवून देणारी आहे.