मुंबई: मराठवाडा आणि विदर्भात पावसाने थैमान घातले आहे. यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)
Shahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही
जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सप्टेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल दहा जिल्ह्यांतील सुमारे ८.५ लाख हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत. ६०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. नांदेड सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)
सप्टेंबरच्या सुरुवातीच्या चार दिवसांतच राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाने मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल दहा जिल्ह्यांतील सुमारे ८.५ लाख हेक्टर वरील पिके वाहून गेली आहेत. ६०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख ३९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला… pic.twitter.com/fkCz6futqF
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 5, 2024
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काल या भागात जावून पाहणी केली खरी पण ही पाहणी केवळ ‘इव्हेंट’ नसावा अशी आमची माफक अपेक्षा आहे. इव्हेंट आणि जाहिरातींसाठी हे सरकार ४००-४०० कोटी रुपये खर्च करत आहे. अशा परिस्थितीत सध्या रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी आमची मागणी आहे. (Jayant Patil’s request to the government, help the farmers who have suffered due to rain)