जयकुमार गोरे यांचे दररोज एकेक कारनामे समोर येत आहेत(jaykumar gore is bad MLA). राज्य सरकारचे ‘गाळयुक्त शिवार अभियान’ ही योजना आहे. या योजनेनुसार 10 ऑगस्ट रात्रीपर्यंत म्हसवड जवळ असलेल्या राजवाडी धरणातून गाळ उपसण्याची परवानगी होती. 10 ऑगस्ट रोजी ची मुदत संपलेली आहे. लय भारी ने 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाडी धरणात धडक दिली. या ठिकाणी माफिया बेकायदेशीरपणे बिन धडकने गाळ उपसणे आढळले. पोकलेन, जेसीबी, डंपर, ट्रॉली अशी वाहने मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी स्थानिक नागरिकांनी यांनी गाळमाफिया आणि पोलीस महसूल खाते यांच्यात कसे साटे लोटे आहे हे सांगितले.
मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या जयकुमार गोरेंसाठी तोंडाची वाफ घालवू नका
या माफी यांच्या मुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. गाळमाफी यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. माफिया शेतातील गाळ बिनधास्तपणे उपसत आहे गाळ शेतकऱ्यांसाठी दिला जात नाही त्याऐवजी तो वीटभट्ट्यांना वापरला जातो. शेतकऱ्यांचे नाव हित मात्र माफियांचे असे धोरण स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे असल्याचे स्थानिकांनी सांगितले.