30 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore | आमदारांनी १५ वर्षांत स्वत:ची घरे भरली | अंध व्यक्तीने...

Jaykumar Gore | आमदारांनी १५ वर्षांत स्वत:ची घरे भरली | अंध व्यक्तीने मनातलं सांगितलं

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच विकास केला असा दर्प जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत असतात(Jaykumar Gore | MLAs filled their houses in 15 years).

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे. मीच विकास केला असा दर्प जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत असतात(Jaykumar Gore | MLAs filled their houses in 15 years). जयकुमार गोरे यांच्या तथाकथित विकासासंबंधी सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माण – खटाव मतदारसंघातील येळेवाडी या गावात लय भारीचे संपादक पोचले. या मतदारसंघात फिरत असताना येळेवाडी मध्ये वामन तांबे हे धनगर भेटले.

Sharad Pawar | Jaykumar Gore यांचा शेजारी म्हणतो, शेतकऱ्यांसाठी शरद पवार किंग, जयकुमार गोरे पडणार

त्यांनी धनगर आंदोलनाबद्दल आपले मत मांडले पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आरक्षण प्रकरणी आक्रमण होत संताजी वाघमोडे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आरक्षणावरती तातडीने निर्णय घेण्याची धनगर समाजाची मागणी केली आहे आणि यामध्ये पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन खूप दिवस आंदोलन करून त्यांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे संताजी वाघमोडे यांनी आज आंदोलना इथे आत्महत्याचा प्रयत्नही केला. तसेच त्यांनी आताचे सरकार व तेथील आमदार यांच्याबद्दल आपले मत मांडले, जयकुमार गोरे गावात येतात. गावटग्यांना भेटतात. मोठमोठ्या माणसांना भेटतात. पण गरीब शेतकऱ्यांना कोणी भेटत नाही, अशी भावना या महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण – खटाव मतदारसंघात गुंड पोसले आहेत.

Shahajibapu Patil | Jaykumar Gore | जयकुमार गोरेंचे नाव घेताच शहाजीबापू पाटलांचे समर्थक खवळले

विरोधक, पत्रकार, साहित्यिक, अधिकारी वर्ग, सरकारी यंत्रणा यांना धाकात ठेवण्यासाठी जयकुमार गोरे हे सतत आपल्या गुंडांना उत्तेजन देत असतात. गेल्या आठवडाभरापासून आमदार जयकुमार गोरे यांच्या घोटाळ्यांची, दादागिरीची चिरफाड करणारी बातमीदारी ‘लय भारी’ने आक्रमकपणे केलेली आहे. यात जयकुमार गोरे यांनी माण व खटाव तालुक्यांत कशा पद्धतीने गुंडगिरी जोपासली आहे, याचे वारंवार तपशिल दिलेले आहेत. जयकुमार गोरे यांनी जोपासलेल्या गुंडगिरीचा शुक्रवारी ‘लय भारी’ला प्रत्यय आला. जयकुमार गोरे यांच्या विकासाचा बुरखा फाडणाऱ्या या प्रतिक्रिया ‘लय भारी’ लवकरच प्रसिद्ध करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरे यांची संभावना ‘जनावरांवर भुंकणारा कुत्रा’ अशी केली आहे. ही उपाधी सार्थ ठरविण्याचा चंग जयकुमार गोरे बांधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार एखादं कुणी चांगलं काम करीत असेल तर त्याला ते काम करू द्यायचं नाही, त्या व्यक्तीवर कुत्र्यासारखं भुंकायचं, अशी कार्यपद्धतीत जयकुमार गोरे यांची आहे. हे भुंकण्याचं काम जयकुमार गोरे व त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी