30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रबाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

बाबासाहेब पुरंदरे यांनी संशोधित केलेल्या आणि लिहिलेल्या इतिहासाबाबत अनेक प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. अनेकदा बाबासांहेबांच्या इतिहासाला विरोध करणारे बहुतेकवेळा इतिहास संशोधक आणि अभ्यासकच असताता. असेच बाबासाहेबांच्या इतिहासावर टिका करणारे नाव म्हणजे जयसिंगराव पवार.

बाबासाहेब पुरंदरे यांनी संशोधित केलेल्या आणि लिहिलेल्या इतिहासाबाबत अनेक प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. अनेकदा बाबासांहेबांच्या इतिहासाला विरोध करणारे बहुतेकवेळा इतिहास संशोधक आणि अभ्यासकच असताता. असेच बाबासाहेबांच्या इतिहासावर टिका करणारे नाव म्हणजे जयसिंगराव पवार. जयसिंगराव पवार हे नाव सध्या चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे नुकतीच कोल्हापूर् दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची घेतलेली भेटी. ही भेट अनेक कारणांमुळे चर्चेत आली त्यातील प्रमुख कारण म्हणजे राज ठाकरे यांनी नेहमीच बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाला समर्थन देण्याचे काम केले आहे. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात भाष्य करणारे जयसिंगराव पवार आणि राज ठाकरे यांची भेट चांगलीच चर्चेत आली.

या भेटीनंतर माध्यमांसमोर येत राज ठाकरे आणि जयसिंगराव पवार या दोघांनीही आपापली मते स्पष्ट केली. दोघांमध्ये झालेली ही भेट सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरून केल्या जाणाऱ्या वादाला अनुसरुण असल्याचे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि जयसिंगराव पवार यांच्यात सध्या सिनेमाच्या माध्यमातून होणारा इतिहासाचा विपर्यास या गोष्टीवर चर्चा झाली असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांचा विषय निघाल्यानंतर जयसिंग पवार यांनी बाबासाहेबांबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या इतिहासाबद्दल आदर व्यक्त केल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले होते. यावर आता खुद्द जयसिंगराव पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

लहानपणी वर्णद्वेष सहन करावा लागला होता, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा खुलासा

राज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !

7 सिक्स मारताना ‘युवी’च्या नावाचा जप करत होतो, ऋतुराजने केला खुलासा

जयसिंगराव पवार यांनी एक पत्र लिहित याबाबत खुलासा केला आहे. राज ठाकरे यांच्या कोलहापूर दौ-याम माझी भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणार विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम करा त्याचे मी स्वागत करेन असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही

बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण

राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरें बद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांच्या इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही. कारण आत्तापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टिका केलेली आहे, आणि त्यावर आजही ठाम आहे’ या संदर्भात वृतपत्रांत बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे. असं म्हणत इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले शिवाय पुन्हा एकदा बाबासाहेब पुरेंदरे यांनी लिहिलेल्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी