30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad Arrested : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक! सिनेमाचा शो...

Jitendra Awhad Arrested : राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक! सिनेमाचा शो बंद केल्याने कारवाई

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकारानंतर आव्हाडांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. याबाबात जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुक पोस्ट आणि ट्वीट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मुंबईकडे जायला निघालेलो असताना पोलिसांच्या फोननंतर मी स्वत: वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालो. पोलिस निरीक्षकांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. तोपर्यंत डीसीपी राठोड पोलीस स्टेशनमध्ये आले अन् त्यांनी मला ताब्यात घेतलं”, अशी फेसबुक पोस्ट आव्हाडांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केली आहे.

हे सुद्धा वाचा

Rajiv Gandhi Case : राजीव गांधींच्या हत्येतील दोषींबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Bahrat Jodo Yatra : उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी लागत नाही; कन्हैया कुमार यांची भाजपवर टीका

Ramdev Baba: रामदेव बाबा यांना उत्तराखंड सरकारचा झटका; पाच औषधांचे उत्पादन थांबविण्याचे आदेश

फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
“आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. परंतु मी चांगुलपणाने म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही.”

दरम्यान, 2 दिवसांपूर्वी हर हर महादेव सिनेमावरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. मुंबईला जात असताना पोलिसांनी आव्हाड यांना नोटीस घ्यायला बोलावलं होतं. त्यानंतर अचानकपणे त्यांना अटक करण्यात आली असल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी