29 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रआमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा...

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे

देशात ओबीसीची जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी कॉँग्रेस खासदार राहुल गांधी आग्रही आहेत. ‘देशात जातनिहाय जनगणना झाली तर धार्मिक उन्माद समाप्त होईल.’ असा आशावाद जनता दल (यू) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केला. असे असताना, ‘बहुजनांनो एक व्हा ! भारत तुमचा आहे’ असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ‘बिहारमध्ये झालेल्या जातीय जनगणनेनुसार हे स्पष्ट होत आहे की, OBC + SC + ST मिळून 84 टक्के आहे. जर बिहारमध्ये हे चित्र आहे, तर भारतामध्ये वेगळं चित्र असूच शकत नाही. कांशिरामजी यांनी जे सांगितल होत तेच सत्य आहे. “जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी हिस्सेदारी”.’ असे त्यांनी एक्स (ट्विट) केले आहे.

‘जातीनुसार जनगणना झालीच पाहीजे. या जगाला परत एकदा कळू द्या की, भारतामधील सामाजिक स्थिती काय आहे. बिहारने जे समोर आणलं आहे ते भारताचे  सत्य समोर येऊ नये यासाठीच केंद्र सरकार जातीय जनगणनेला नकार देत आहे. बहुजनवादी विरुद्ध मनुवादी या लढाईत बहुजन कुठे आहे हे कोणालाही समजू नये यासाठी चाललेली ही लढाई आहे.’ असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

केंद्राने संसद आणि विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. यावर बोलताना राहुल गांधी यांनी देशात ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. पण त्यांची जातीनुसार जनगणना झालीच नाही. त्यामुळे हा घटक अनेक बाबीपासून वंचित आहे. असे सांगितले होते. ते गेल्या काही दिवसापासून या मागणीसाठी देश पातळीवर दौरे करत आहे.

हे सुद्धा वाचा
जातनिहाय जनगणनेच धार्मिक उन्माद संपेल – जनता दल (यू) राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा आशावाद
‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!
वाघनखांनी काढला आरोपांचा कोथळा, ‘ती’ वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा

 

बिहारने जातनिहाय जनगणना करून देशाला पुढे जाण्याचा रस्ता दाखवला आहे. असे असताना केंद्र सरकार जातीनुसार जनगणना करण्यास तयार नाही. जर असे झाले तर जो समाज देशात जास्त प्रमाणात आहे. त्याला सत्तेत आणि प्रशासनात वाटा द्यावा लागेल. तोच केंद्र सरकारला नकोय त्यामुळेच जनगणना होत नसल्याचा आरोप विरोधक करत असून त्यासाठी केंद्र सरकारकडे उत्तर नाही.

राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आदी मुद्दे पुढे आले  आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोटामधील आरक्षण देऊ नये अशी मागणी काही ओबीसी संघटना करत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर आव्हाड यांचे ट्विट आले आहे. आता सत्ताधारी काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी