33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रSharad Pawar : शरद पवारांविषयी जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

Sharad Pawar : शरद पवारांविषयी जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असत आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव.

आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते (शरद पवार) शिबीरामध्ये दाखल झाले, अशी भावनिक पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेसबुकवर करत त्यांना सलाम केला आहे. शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ हे शिबिर सुरू आहे. या शिबिरासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तब्बेत बरी नसताना देखील उपस्थित राहिले आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शरद पवार यांना न्युमोनिया झाल्याने ते गेले तीन-चार दिवस मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे ते या शिबिराला उपस्थित राहणार कि नाही याबाबत सर्वांच्याच मनात आशंका असताना देखील आज शरद पवार आजारी असताना देखील कार्यक्रमाला उपस्थित राहीले. त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये देखील उत्साह संचारला.

शरद पवारांनी या शिबिराला उपस्थिती दर्शविल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविषयी भावनिक पोस्ट केली, त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज साहेब थेट इस्पितळातून निघून शिबीरामध्ये आले आणि परत निघून आता इस्पितळात दाखल झाले असतील. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत राजकारण करायच असत आणि त्या प्रतिकूल परिस्थितीची दिशा बदलून ती आपल्या दिशेने वळवायची आणि त्यावरुन मार्गक्रमण करुन त्याच्यावर विजय प्राप्त करायचा हा त्यांचा स्थायी स्वभाव.
हे सुद्धा वाचा :
Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

Mumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज?
आजही तब्येत साथ देत नसताना कार्यकर्त्यांमध्ये जोम आणि उत्साह आला पाहिजे आणि तो माझ्यामुळेच येईल याची त्यांना कल्पना असल्यामुळे आज ते शिबीरामध्ये दाखल झाले. त्यांच्या ईच्छाशक्तीला सलामच करावा लागेल. राजकारण हे 24 तास करावं लागतं. त्याच्या अधे-मधे सुट्टी घेता येत नाही. हे त्यांनी साठ वर्षे केले आणि आजही ते करीत आहेत. राजकारण हे सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत करण्याचा विषय नाही. तर सकाळी 7 ते दुस-या दिवशी सकाळी 7 म्हणजे 24 तास 365 दिवस करण्याचा विषय आहे हे त्यांच्या क्रियेतून ते दाखवतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी