33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra News : सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे - डॉ....

Maharashtra News : सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

आर.के. लक्ष्मण यांनी ज्याप्रमाणे सामान्य माणसाच्या व्यथा व्यंगचित्रातून मांडल्या तसे सामान्य माणूस समोर ठेवून, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून एका कार्यक्रमामध्ये करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहात मराठी पत्रकार परिषदेचे 43 व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते. 16 नोव्हेंबरला राज्यभरात राष्ट्रीय पत्रकारिता दिवस साजरा करण्यात आला. याच निमित्ताने मराठी पत्रकार परिषदेचे 43 वे द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी पत्रकारिता याबाबत आपले मत व्यक्त केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सामान्य माणसाला समोर ठेऊन आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे मनोगत यानिमित्ताने व्यक्त केले.

विधान परिषदेच्या उपभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या बातम्या वाचायला चांगल्या वाटतात. पत्रकारिता आणि न्यायव्यवस्था हा नागरिकांचा खरा आधार आहे. अशा प्रकारच्या पत्रकारितेची समाजाला गरज आहे. केवळ टीआरपी केंद्रीत बातम्यांभोवतीच आजची पत्रकारिता फिरू नये आणि सभोवतीच्या गढूळ वातारणातही चांगले घडविण्यासाठी व्यावसायिकरित्या चांगले काम करणाऱ्या आणि निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रतिसाद मिळावा.

आज समाजातील असहिष्णुता वाढली आहे. पूर्वी भाषेतला रांगडेपणा होता. मात्र अलिकडे टीका करण्यातला वैचारिक स्तर खालावला आहे. याचा समाजातल्या पत्रकारांना जसा त्रास होतो, तसे ज्यांना काही विचार व्यक्त करायचे आहे त्यांनाही त्रास होतो. वर्तमानपत्र आज उत्पादन अनेकांचे उत्पादनाचे स्रोत झाले आहे. त्यामुळे त्याचा खप वाढवणे, इतरांना जोडून घेणे, इतरांपेक्षा अधिक चांगले उत्पादन करणे महत्वाचे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : ‘महाराजांनी औरंगजेबाला माफीसाठी 5 पत्रे लिहिली होती’, भाजप प्रवक्त्याची जीभ घसरली

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

Koshyari’s Controversial Statement : “अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही !”

कोविडनंतर वृत्तपत्रांना मोठा फटका बसला. काहींची नोकरी गेली, काहींचे कोरोनामुळे निधन झाले. उपसभापती असूनही फार करता आले नाही याचा खेद वाटतो, असेही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी मत व्यक्त केले. कोविडमध्ये जे पत्रकार दगावले त्यांची जबाबदारी उद्योग म्हणून चालविल्या जाणाऱ्या माध्यम समूहांनी स्विकारावी. दुसऱ्या बाजूला काही वृत्तपत्रांमध्ये बातम्यांपेक्षा जाहिराती मिळविणे हे प्रमुख काम पत्रकाराला करावे लागते. पत्रकारिता व्यावसायिक असू नये असे आपण म्हणतो, पण तो व्यवसाय जरी झाला असला तरी व्यवसायाचे नियम पाळून पत्रकारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळणे गरजेचे आहे, ते मनोगत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी