32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रBJP : 'कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे'

BJP : ‘कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे’

अशिष शेलार असे लिहितात की, आपण आमच्या कमळाला हिणवायला 'बाई' म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता 'पेंग्व‍िन सेना' म्हणायचे का? ते पुढे म्हणतात, असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत !

राजकारणात डाव प्रतिडाव आलेच. राजकारणात हाणामाऱ्या देखील होता. यापूर्वी राजकारणातून अनेक खून देखील झाले आहेत. चकमकीशिवाय राजकारण असूच शकत नाही हे एक सत्य आहे. आपल्याकडे या घडीला राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. आता राजकारणात शाब्दीक चकमकींना महापूर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भरतीय जनता पार्टीला कमळाबाई म्हणून हिणवले जात आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे चिन्ह हे कमळ आहे. वर्षांनुवर्षे भाजपला कमळाबाई चिडवल्याचा राग त्यांच्या मनात आहे. काही वर्षांपूर्वी मित्र पक्ष असलेल्या भाजपबरोबर शिवसेनेचे खटके उडाले. गेल्या अडीच वर्षांपासून ते एकमेंकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आता त्यांच्यातील वैर वाढले आहे.

त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा भाजपचा उल्लेख कमलाबाई असा केला आहे. त्याचा राग भाजप नेत्यांच्या मनात आहे. तो आत आणखी तीव्रतेने उफाळून येत आहे. आता त्या रागाचा वचवा काढयासाठी भाजपचे नेते अँङ अशिष शेलार(Ashish Shelar)सरसावले आहेत. त्यांनी व्टीटरवर सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे. अशिष शेलार असे लिहितात की, आपण आमच्या कमळाला हिणवायला ‘बाई’ म्हणताय? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता ‘पेंग्व‍िन सेना’ म्हणायचे का? ते पुढे म्हणतात, असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत !

BJP : 'कमळाबाईमध्ये आई, ताई व कडक लक्ष्मी सुद्धा आहे'

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ पक्षी आणले. हा निर्णय त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने घेतला होता. ‘पेंग्विन’ भारतात‍ आणण्यासाठी आदित्य ठाकरे हे आग्रही होते. त्यामुळे त्या वेळपासून त्यांना छोटा ‘पेंग्विन’ असे उपरोधाने चिडवू लागले. ‘पेंग्विन’ शित कटिबंधात राहणारा पक्षी आहे. त्यामुळे भारतात तो जगू शकणार नाही असे सर्वांचे मत होते. मात्र काही ‘पेंग्विन’ जगले आणि राणीच्या बागेची शोभा वाढली. मात्र शिवसेनेचे युवा नेते अदित्य ठाकरेंना चेष्ठेने या नावाने संबोधण्याची किंवा हिणवण्याची प्रथा कायम राहिली.

आता तर एकनाथ शिंदेनी बंड केल्यावर शिवसेनेला गळीत लागली. ही गळती थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे पुन्हा शिवसेना पहिल्या सारखी उभी करण्यासाठी आदित्य ठाकरे धावपळ करत आहेत. त्यांच्या शिवसेनेमध्ये अनेक युवक सहभागी होत आहे. तसेच दुसरे असे की, शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना कोणाची हा वाद मिटलेला नाही. उलट तो आणखी चिघळत चालला आहे. एकनाथ शिंदे गट म्हणते की, शिवसेना आमचीच आहे. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे म्हणतात शिवसेना आमचीच आहे. आमच्या वडीलांची आहे. परंतु निकालानंतर जर शिवसेनेवर शिंदे गटाला ताबा मिळाला तर शिवसेनेचे नाव काय असणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे.

हे सुद्धा वाचा

Ashok Chavan : अशोक चव्हाण – देवेंद्र फडणवीस भेट, अन् इन्कम टॅक्सची धाड !

India Vs Pakistan : उद्या पुन्हा होणार भिडंत

Digital Rape : देशात पहिल्यांदाच ‘डिजीटल रेप’ प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

त्याचे कुतूहल संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आहे. त्याला आज अशिष शेलार यांनी उपरोधीक वळण देऊन तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला ‘पेंग्विन’ सेना म्हणायचे का? असा टोला लागावला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. शिवाय या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना केवळ सामनाचे संपादक असे म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना हिणवण्याचे काम आशिष शेलार यांनी केले आहे. आताच्या घडीला प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक पक्षाचा नेता आक्रमक झाला आहे. सोशल मीडियाचे प्लॅटफार्म मिळाल्यापासून ते एकदम फॉममध्ये आहेत.

कारण आपल्याला हवे त्या वेळेस हवी तशी टीका करता येते. सोशल मीडावरच्या कमेंटस आणि पोस्टमुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. तर नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचे पित्त खवळत आहे. आपल्या कडील नेत्यांना कोणकोणती टोपण नावे आहेत. हे सोशल मीडियामुळे जनतेला चांगलेच माहित झाले आहे. मात्र या उपरोधीकतेचा कळस झाला असून, विनोदाचा हिणकसपणा आणि राजकारण किती खालच्या थराला आले आहे. ते देखील जनतेला समजते आहे. सोशल मीडिया हा जनतेसाठी आरसा आहे. याचे भान राजकारण्यांनी ठेवायला हवे. कारण भारतात लोकशाही आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी