आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतनं पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. एकामागोमाग एक चित्रपट दणाणून आपटत असताना कंगना आता अबू सालेम सोबत व्हयरल झालेल्या फोटोसाठी चर्चेत आली आहे. कंगना आणि अबू सालेम एकत्र असल्याच्या चर्चाना उधाण येताच आता कंगनानंचं या चर्चाना पूर्णविराम दिला. फोटोतील आपल्यासोबतची व्यक्ती अबू सालेम नसल्याचं सांगत तिनंही संबंधितांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. या फोटोतील व्यक्ती अबू सालेम नसून पत्रकार असल्याचं कंगनानं स्पष्ट केलं.
अभिनेत्री कंगना रनौत चित्रपटांपेक्षाही भडक आणि बेधडक विधानांबद्दल प्रसिद्ध आहे. कंगनाचा तामिळ चित्रपट ‘चंद्रमुखी २’ सध्या चर्चेचा विषय आहे. चित्रपटाच्या प्रमोशन पेक्षाही कंगना आणि अबु सालेमचा एकत्र फोटो बीटाऊनमध्ये गॉसिपचा विषय ठरला आहे. चित्रपटाची प्रदर्शन तारीख जवळ येताच २८ सप्टेंबरच्या आसपास हा फोटो व्हरायल झाला. एका हॉटेलमध्ये दोघांनीही उभं राहून फोटोत पोझ दिलीये. हा फोटो ‘एक्स'(पूर्वीचे ट्विटर)या सोशल मीडियावर एकानं पोस्ट केला. फोटोबद्दल गोसिपिंग सुरु झाल्यावर गप्प राहील ती कंगना कसली? तिनंही तातडीनं फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं.
I don’t believe congress people really think he is the dreaded gangster Abu Salem hanging out with me casually in a mumbai bar 😂😂😂
He is ex TOI entertainment editor his name is Mark Manuel
They are such cartoons my God 😂😂
Tabhi inki party ki yeh halat hai 🤣 https://t.co/ySpstzfjvm— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 30, 2023
मुंबईच्या बारमध्ये माझ्यासोबत सहज दिसून आलेला गुंड प्रवृत्तीचा अबू सालेम दिसतोय का असा प्रश्न कंगनानं उपस्थित केला. माझ्यासोबतची व्यक्ती टाइम्स ऑफ इंडियाचे माजी मनोरंजन संपादक असल्याचं कंगनानं सांगत वादावर पडदा टाकला. हा फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला कंगनानं चांगलंच झापलं. संबंधित व्यक्ती काँग्रेस विचारसरणीची असल्याचा दावा तिनं केला. काँग्रेसच्या लोकांना खरोखरच वाटते की फोटोतील व्यक्ती गुंड अबू सालेम आहे, प्रत्यक्षात ही व्यक्ती टाइम्स ऑफ इंडियाचे माजी मनोरंजन संपादक मार्क मॅन्युअल आहे. ही काँग्रेसची माणसं कार्टून असल्याचं वक्तव्यही तिनं केलं. या माणसांच्या स्वभावामुळे पक्षाची स्थिती चांगली नसल्याची टिप्पणी कंगनानं केली. कंगना गेल्या बऱ्याच वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं जाहीर समर्थन करतेय. त्यामुळे इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांवर कंगना सतत टीका करत असते.
हे ही वाचा
जॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…
55 वर्षांच्या दिप्ती भटनागरचे तरुणींना लाजवेल असे ‘सौंदर्य’
आता तू मालदिवलाच रहा; चाहत्यांचा सोनाक्षीला चिमटा !
कंगना रणौत कोणत्याही ट्रेंडिंग विषयावर भाष्य करण्याची संधी सोडत नाही. कोणत्याही राजकीय विषयावर केलेल्या धाडसी विधानांमुळे ती सतत प्रसिद्धीत राहते. कंगनाने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करण जोहरवर घराणेशाहीचा समर्थक असल्याचा आरोप केला होता. हा वाद बराच चिघळला. करण जोहर निर्मित आर्यन मुखर्जी दिग्दर्शित प्रकल्प ‘ब्रह्मास्त्र’ वरही कंगनानं टीका केली. हा चित्रपट फ्लॉप होईल असं कंगनानं सांगितलं होतं, प्रत्यक्षात ‘ब्रह्मास्त्र’ हिट ठरला. त्यानंतर चित्रपटातील नायक नायिका आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी माझ्यावर नजर ठेवण्यासाठी गुप्तहेर नियुक्त केल्याचा आरोपही कंगनानं केला.