30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटकात पाणी टंचाई; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एकनाथ शिंदेंना पत्र

कर्नाटकात पाणी टंचाई; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे एकनाथ शिंदेंना पत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज्यातील पिण्याच्या पाण्यासाठी कोयना/वारणा नदीतून कृष्णा आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत पाणी सोडण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदेना लिहलेल्या पत्रात त्यांनी, कडाक्याच्या उन्हामुळे कर्नाटक मधील काही जिल्ह्यात मार्च २०२३ पासुन बेळगावी, विजयपुरा, बागलकोट, यादागिरी, रायचूर या नद्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याची माहिती सांगितली आहे.

उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे लोकांना आणि पशुधनांना घरगुती वापरासाठी पाण्याची गरज असताना पावसाळा अद्याप सुरू झालेला नाही. सध्या “पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी वारणा/कोयना नदीतून दोन टीएमसी पाणी भीमा नदीत तात्काळ सोडण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी माझी विनंती आहे”, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

हे देखील वाचा

एसटी सेवेची 75 वर्षे; महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन “लालपरी”

कोकणवासीयांना पंतप्रधान मोदींची भेट; 5 जून मुंबई-गोवा मार्गावर धावरणार वंदे भारत

मान्सूनपूर्व पाऊस राज्याला तडाखा देणार !

याआधी देखील मे महीन्यात कर्नाटक सरकारच्या विनंतीनंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकसाठी १ टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले होते. पण वाढत्या उन्हामुळे कर्नाटककडून ५ टीएमसी पाणी अजून सोडण्याची विनंती केली जात आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले. यासंदर्भात सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी