28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रकर्नाटक विजय आणि 'पप्पू' टू 'रागा' व्हाया भारत जोडो पदयात्रा

कर्नाटक विजय आणि ‘पप्पू’ टू ‘रागा’ व्हाया भारत जोडो पदयात्रा

कर्नाटकात आज काँग्रेसला बंपर यश मिळाले आहे. या यशामागे राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेचा प्रभाव पडल्याचे काँग्रेसने म्हटले. तसेच निवडणुक स्थानिक मुद्द्यांर लढली गेली. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यासाठी हि निवडणुक मोठी ताकद देणारी ठरली आहे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर देखील प्रभाव पाडणारी हि निवडणुक ठरु शकते. भाजपच्या आक्रमक प्रचारापुढे काँग्रेसने ही निवडणुक अत्यंत जोशात लढून जिकून दाखवली. या निडणुकीने राहुल गांधी यांचे प्रतिमा बदलून टाकणारे नेतृत्व समोर आले असून या नव्या प्रतिमेचा प्रवास भारत जोडो यात्रेतून घडला, त्याचा थोडक्यात धांडोळा.

युपीए सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे मळभ दाटत असतानाच  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच अच्छे दिन आयेंगे, अब की बार मोदी सरकार म्हणत भाजप 2014 साली मोठ्या बहुमताने सत्तेत आले. काँग्रेसमुक्त भारत म्हणत भाजपने आपला विजयाचा वारू देशभरात फिरविण्यास सुरुवात केली. या काळात काँग्रेसची मोठी पडझड झाली. पण भाजपच्या अत्यंत टोकदार प्रचारामुळे राहुल गांधी यांची पप्पू प्रतिमा निर्मान करण्यात भाजप यशस्वी देखील झाली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला विरोधीपक्ष म्हणुन देखील संसदेत स्थान टिकविता आले नाही. तेवढी सदस्य संख्या गाठणे देखील काँग्रेसच्या नाकी नऊ आले. राहुल गांधी यांची 2014 च्या लोकसभेत म्हणावी अशी छाप देखील पडली नाही. भाजपच्या प्रचारापुढे ते टीकले नाहीत. त्यातच 2019 ची लोकसभा निवडणुक देखील भाजपने एकहाती खिशात घातली. काँग्रेसला या निवडणुकीत आशा होती. मात्र भाजपने आपल्या प्रचारतंत्राने ही निवडणुक जिंकली. काँग्रेसमध्ये देखील मोठी धुसफुस या काळात सुरु झाली जी 23 चे एक पत्र मीडियात व्हायरल झाले आणि राहुल गांधी यांच्या विरोधातील ज्येष्ठ नेत्यांचा सुर लक्षात आला. काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे होते, ते त्यांनी सोडले. निवडणुका घेतल्या आणि मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

2014 ते 2019 पर्यंत राहुल गांधी यांची माध्यमांमधून तयार केलेली पप्पू प्रतिमा काँग्रेस आणि गांधी घराण्यासाठी देखील अत्यंत खडतरच ठरली. मात्र या सगळ्या प्रतिकुल काळात राहुल गांधी मात्र शांतपणे राजकारणाचा एकएक सोपान चढत राहीले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी जोरदारा प्रचार सभा घेतल्या. मात्र यश आले नाही. कोरोना काळ संपल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची घोषणा केली. कन्याकुमारी ते काश्मिर असा दक्षिणेकडून उत्तरेकडचा खालच्या दिशेने वरच्या दिशेकडे जाणारा जवळपास 4500 किलोमीटरचा पदयात्रेचा हा मार्ग.

कन्याकुमारीपासून ही पदयात्रा सुरु झाली. दक्षिणेत सरुवातीलाच या पदयात्रेला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. तामिळनाडू, केरळचा प्रवास करत राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात आली. नांदेड जिल्ह्यात यात्रेचे मोठे स्वागत झाले. महाराष्ट्रातील तसे पहायला गेले तर कोणत्याही मोठ्या शहरातून ही पदयात्रा नव्हती. मात्र यात्रेला जोरदार प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला. अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी या यात्रेला पाठींबा दिला. थंडी, उन, पाऊस, बर्फवृष्टीत देखील भारत जोडो यात्रेत खंड पडला नाही. काश्मिरमध्ये पाऊस बर्फवृष्टी सुरु असताना देखील यात्रेचा समारोप तेथे झाला.

भारत जोडो यात्रेत लोकांचा उत्फुर्त सहभाग दिसून आला. अनेकांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी पदयात्रा केली. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या यात्रेला पाठींबा दिला. राहुल गांधी यांचा हा पायीप्रवास राहुल गांधी यांना मोठे करुन गेला. राहुल गांधींचे लोकांना सहजतनेने भेटणे, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला अशा वेगवेगळ्या स्तारातील लोकांनी राहुल गांधी यांना जवळून पाहिले. राहुल गांधी यांनी या सगळ्यांशी सहजतेने संवाद साधला. याच पदयात्रेत राहुल गांधी यांनी सावरकरांवर जोरदार हल्लाबोल केला. सावरकरांच्या मुद्दयावरुन ते मागे हटले नाहीत. शिवाय लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून जमीनीवरचे प्रश्न देखील त्यांनी जाणून घेतले.

राहुल गांधी यांची पप्पू प्रतिमा या यात्रेने पुसली गेलीच पण त्यांची लोकप्रियता देखील प्रचंड वाढली. या पदयात्रेतच त्यांची ‘रागा’ ही नवी प्रतिमा निर्मान झाली. यात्रेचे अत्यंत काटेकोर नियोजन, कुठे सभा, कुठे विश्रांती, कुठे लोकांशी संवाद हे सगळं काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्धपणे केले. लोकांशी संवाद साधने त्यांचे प्रश्न जाणून घेणे, सभांमधून जनतेलो संबोधीत करणे या सगळ्या गोष्टी राहुल गांधी यांना या यात्रेतून करता आल्या. त्यानंतर राहुल गांधी यांचा लंडन दौरा गाजला. लंडन दौऱ्यानंतर अदानी प्रकरण संसदेत राहूल गांधी यांनी लावून धरले. याच दरम्यान मोदी नावाच्या उल्लेखावरुन सुरु असलेल्या खटल्याचा निकाल लागला आणि राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. राहुल गांधी यांची तातडीने खासदारकी रद्द झाली. त्यांना बंगला सोडावा लागला. या सगळ्या घडामोडीचां राहुल गांधी यांच्यासाठी सकारात्मक परिनाम झाल्याचेच दिसून आले.

हे सुद्धा वाचा

आमच्या विजयात नरेंद्र मोदींचा 50 टक्क्यांचा वाटा; कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची प्रतिक्रीया

शरद पवार तयारीला लागले; कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीची बोलविली बैठक

कर्नाटक : 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेस 119; स्पष्ट बहुमत!

कर्नाटक निवडणुकीत आज कांग्रेसला मोठे यश मिळाले. कर्नाटकात स्पष्ट बहुमताचे सरकार काँग्रेस स्थापन करत आहे. भाजपने अत्यंत आक्रमक प्रचार कर्नाटकात केला. राहुल गांधी यांनी देखील कर्नाटकात जोरदार प्रचार करत 40 टक्क्यांचे सरकार हा भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला. स्थानिक प्रश्नांवर या निवडणुकीत भर दिला. नंदिनी दुध, नोकऱ्या, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर काँग्रेसने जोरदार प्रचार केला. स्थानिक नेत्यांवर भरोसा ठेवत राहुल गांधी यांनी कर्नाटकात हवेची दिशा फिरवली. सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार या राज्यातील नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसने व्यूह रचना केली. प्रियांका गांधी यांनी देखील सभा घेत प्रचार केला.

सोशल मिडयाचा प्रभावी वापर

भारत जोडो यात्रेचा लोकांवर मोठा प्रभाव पडण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर. सोशल मीडियातून फारत जोडो यात्रेचे व्हिडीओ, फोटो, भाषणे, पदयात्रा अशा क्षणचिंत्रांचा लोकांवर मोठा प्रभाव पडला. याच यात्रेत राहुल गांधी यांना ‘रागा’ हि नवी ओळख तयार झाली. अदानी प्रकऱण, सावरकर प्रकरणात राहुल गांधी यांचा आक्रमकपणा दिसून आला. या सगळ्यात सोशल मीडियातून काँग्रेसने राहुल गांधी यांची ‘ रागा’ प्रतिमा समोर आणली आणि ती लोकांच्या मनावर बिंववण्यात काँग्रेस यशस्वी देखील झाली.

प्रवक्त्यांचा आक्रमकपणा

टीव्ही डिबेटमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते तोडीसतोड सवाल जवाब करताना दिसता. सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, रणदिपसिंग सुरजेवाला यांनी राष्ट्रीय माध्यमांमध्ये भाजपच्या प्रवक्त्यांवर तोडीस तोड प्रतिक्रीया देताना दिसतात. सुप्रिया श्रीनेत सोशल मीडियावर अत्यंत अॅक्टीव्ह असतात. काँग्रेसचा शोशल मीडिया अत्यंत प्रभावीपणे चालवला जात असल्याचे देखील गेल्या काही काळापासून दिसून येत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी