महाराष्ट्र

BHR scam : खडसेंचा गौप्यस्फोट- बीएचआर घोटाळा प्रकरणात बड्या नेत्याचा सहभाग

टीम लय भारी

जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात (BHR scam) बड्या नेत्याचा सहभाग असून त्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी खडसे 2018 पासून पाठपुरावा करत आहेत. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येईल, असे खडसे यांनी सांगितले. बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असताना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणा-या अ‍ॅड. कीर्ती पाटील देखील उपस्थित होत्या.

खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये अ‍ॅड. कीर्ती पाटील यांनी राधामोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्ल्यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्तीकडून दबाव आणण्यात आल्याने तात्पुरती स्वरूपाची चौकशी झाल्याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्याचे खडसे यांनी सांगितले

गिरीश महाजन यांनी या प्रकरणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यावर एकनाथ खडसे यांनी नुसता तोंडी बोलणे उपयोग नाही. पूराव्या शिवाय मी बोलत नाही. अशी प्रतिक्रिया देत कुठलेही पुरावे नसताना माझ्यावरही आरोप करण्यात आले होते. अनेक वर्ष माझ्यावर अन्याय करण्यात आला. पण मी पुराव्याशिवाय आरोप करत नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

22 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

22 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

23 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

23 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

24 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago