29 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरमहाराष्ट्रVideo : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी !

Video : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी !

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजूरीच्या श्री खंडोबाला आज चंपाषष्ठीनिमित्त लाखो दर्शनाला लाखोंच्या संख्येने भक्तांनी भेट दिली. गेले सहा दिवसांपासून चंपाषष्ठीचा उत्सव जेजुरी गडावर सुरू आहे. त्याच शनिवार, रविवार सोमवारी सु्ट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी गडावर पहायला मिळाली, भंडारा खोबऱ्याची उधळण करत... येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भाविकांनी खंडेरायाच्या चरणी माथा टेकवला.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजूरीच्या श्री खंडोबाला आज चंपाषष्ठीनिमित्त लाखो दर्शनाला लाखोंच्या संख्येने भक्तांनी भेट दिली. गेले सहा दिवसांपासून चंपाषष्ठीचा उत्सव जेजुरी गडावर सुरू आहे. त्याच शनिवार, रविवार सोमवारी सु्ट्ट्यांमुळे भाविकांची अलोट गर्दी गडावर पहायला मिळाली, भंडारा खोबऱ्याची उधळण करत… येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात भाविकांनी खंडेरायाच्या चरणी माथा टेकवला.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षड् रात्रोत्सव असतो चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. शकंराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मनी-मल्ल या असुरांचा नाश केला तो चंपाषष्ठीचा दिवस. या दिवसानिमित्त भरीत रोडग्याचा नैवैद्य खंडेरायाला दाखविण्यात येतो. मार्तंड देवसंस्थान समितीचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी सदस्य सुनील अस्वलीकर यांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले की, गेल्या सहा दिवसांपासून जेजूरी गडावर मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी भेट दिली. सोमवारी आणि मंगळवारी (दि. 29) गडावर मोठ्या संख्येने गर्दी होती. मात्र भावि्कांना अतिशय सुलभतेने दर्शन घेता आले. तालुका प्रशासन, पोलीस, आणि पुजारी वर्गांने देवस्थाने अतिशय नेटके नियोजन केले होते.

हे सुद्धा वाचा

ऋतुराजने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात धरली होती, 7 षटकारांनंतर आई-वडिलांचे कौतुकोद्गार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशीलता; रुग्णांना एअर लिफ्ट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड!

मुंबई विद्यापीठाचा अजब कारभार, कायद्याच्या अभ्यासक्रमात बेकायदा उपद्व्याप !

Khandoba prayers In Jejuri Champa Shashthi

गेल्या सहा दिवसांपासून जेजूरी गडावर भक्तीभावाचे वातावरण असून मंदीरावर फुलांची सजावट, विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. गडावर भंडारा खोबऱ्याची जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती देखील सुनील अस्वलीकर यांनी दिली. गेले पाच दिवस गडावर भाविकांसाठी पुजारी अन्नछत्र मंडळातर्फे अन्नदान देखील करण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत साधारण पाच ते सहा लाख भाविकांनी गडावर दर्शनासाठी भेट दिली. शिवाय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता, वावई निहार ठाकरे यांच्या कुटुंबयांकडून देवाला महानैवेद्य दाखवल्याची माहिती, सुनील अस्वलीकर यांनी दिली.

काय आहे चंपाषष्ठीचे महत्त्व

कृत युगामध्ये मणी आणि मल्ल हे दैत्य अत्यंत हौदोस घातला होता. त्यांना ब्रह्मदेवाने वरदान दिल्यामुळे ते अतिशय उन्मत्त झाले होते. त्यामुळे या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. मार्तंड भैरवाने आपल्या सात कोटी सैन्यासह मणी आणि मल्ल या दैत्यांवर आक्रमण केले. आणि या दोन्ही दैत्यांचा युद्धात वध केला. मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला त्या दिवसाला चंपाषष्ठीचा उत्सव साजरा केला जातो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी