29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan : अबब ! कोकणच्या रस्त्यांची भयानक चाळण !

Konkan : अबब ! कोकणच्या रस्त्यांची भयानक चाळण !

वींद्र मालुसरे असे या कोकणातल्या माणसाचे नाव आहे. मालुसरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘गणपतीला कोकणात जाणार... कोकणी माणसाचा शारीरिक व‍िमा कोण काढणार ?’ अशी पोस्ट टाकून त्यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा‍ व्ह‍िडीओ शेअर केला आहे.

गौरी गणपतीचा सण जवळ आला असून, कोकणातले चाकरमाने आपल्या गावाकडे सणसाठी जायची तयारी करत आहेत. कोकणी माणूस आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. काहीही झाले तरी कोकणातला माणूस हा गणपतीसाठी गावाला आपल्या घरी, नातेवाईकांकडे जातो. ते त्यांचे दरवर्षीचे ठरलेले असते. त्याच प्रमाणे दरवर्षी कोकणात जातांना याच कोकणी माणसांना खडतर प्रवास करावा लागतो. कारण मुंबई गोवा महामार्गाची दरवर्षी पावसाळयात चाळण झालेली असते. या वरुन एका युजर्सने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

रवींद्र मालुसरे असे या कोकणातल्या माणसाचे नाव आहे. मालुसरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘गणपतीला कोकणात जाणार… कोकणी माणसाचा शारीरिक व‍िमा कोण काढणार ?’ अशी पोस्ट टाकून त्यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा‍ व्ह‍िडीओ शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

‘नेमिची येतो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे पावसाळा हा दरवर्षी न चुकता येतो. मुंबईसह कोकणात धुवाधार पाऊस कोसळतो. त्यामुळे दरवर्षी कोकणात जाणारे रस्ते खडडयानी भरलेले असतात. आपल्या राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. अनेक नेते आले आणि गेले. परंतु ही समस्या कायम राहिली. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदु्र्ग, पालघर हे जिल्हे कोकणात मोडतात. इतक्या ठिकाणच्या माणसांना प्रवासात मोठी कसरत करावी लागते. कोकणातील अनेक नेत सत्ताधरी आहेत. तसेच विरोधात आहेत. राज्य सरकारमध्ये आहेत.

तसेच केंद्र सरकारमध्ये आहेत. मात्र यापैकी कोणीही कोकणातील ही समस्या सोडवू शकलेला नाही. अनेक जण कोकणात जाण्यासाठी विशेष गाडयांची सोय करतात. तर कोणी त्रास होऊ नये म्हणून रेल्वेने जातात. मात्र प्रत्येकाला रेल्वेने प्रवास करणे शक्य नाही. रेल्वेने गेले तरी नंतर पुढचा प्रवास हा रस्त्यांनी करावाच लागतो.

निवडणुकीत हीच नेते मंडळी मते मागण्यासाठी दारोदारी फ‍िरतात, निवडणूक झाली की त्यांना दिलेल्या वचनांचा विसर पडतो. कोकणातील माणसं साधी भोळी आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असल्याने त्यांचा फायदा घेतला जातो. मुंबई नागपूर महामार्ग मागून सुरु झाला तो की सुंदर बनला आहे. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम 12 वर्षांपासून सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी