28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रकोकणBus Accident : दापोलीत दोन बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात

Bus Accident : दापोलीत दोन बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात

एसटी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी असल्याने सर्वसामान्यांना एसटीचा म्हणजेच लालपरीचा प्रवास नेहमीच सुखद वाटतो. परंतु निष्काळजीपणाने असे अपघात घडू लागले तर सर्वसामान्यांनी काय करायचे असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येऊ लागला आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आज भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दोन एसटी बस एकमेकांना समोरून धडकल्याने हा मोठा अपघात झाला. यामध्ये एसटीची समोरची बाजू पुर्णपणे चक्काचूर झाल्याने एका बसचा चालक यात गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाशांमध्ये महिला आणि विद्यार्थी यांचा समावेश जास्त असून आतापर्यंत यात 25 जण जखमी झाल्याचा आकडा समोर आला आहे. सर्व जखमींंना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. एका बसचे स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे बस चालकाला अंदाज आला नसावा आणि समोर येणाऱ्या बस चालकाला हे कळले नसावे म्हणून अपघात घडला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दापोली शहरात आज दोन एसटी बस अचानकपणे समोरासमोर आल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता जास्त असल्याने एसटीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला, त्यामुळे एका बसचा चालक यात गंभीर जखमी झाला. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये विद्यार्थांची संख्या मोठी होती. अपघातातील जखमींमध्ये 25 जणांचा समावेश असून सर्व जखमींना शहराच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे महिलांची सुद्धा संख्या जास्त होती.

हे सुद्धा वाचा…

Layagar :’लायगर’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच तेलगु भाषिकांची सर्वांत जास्त पसंती

Uday Samant :’ते’ घोषणा न देणारे 15 आमदार शिंदे गटात येणार – उदय सामंत

Leopard : बिबट्याला घाबरुन 18 दिवसांपासून 22 शाळांना सरकारने लावले कुलूप

दरम्यान, अपघात झाल्याचे कळताच तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलीस सुद्धा पोहचले असून अपघात झालेल्या ठिकाणी बघ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत अद्याप कोणतेच ठोस कारण समजलेले नाही तसेच या दोन्ही बस कुठून कुठे निघाल्या होत्या, बसमधील एकूण प्रवासी संख्या किती होती याबाबत सुद्धा अद्याप काहीच कळालेले नाही.

परंतु, बसचे स्टेअरिंग लाॅक झाल्यामुळे कदाचित हा अपघाच घडला असावा असा प्राथमिक अंदाज सध्या बांधण्यात येत आहे. एसटी बसच्या अपघाताचे प्रमाण कमी असल्याने सर्वसामान्यांना एसटीचा म्हणजेच लालपरीचा प्रवास नेहमीच सुखद वाटतो. परंतु निष्काळजीपणाने असे अपघात घडू लागले तर सर्वसामान्यांनी काय करायचे असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येऊ लागला आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी