34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले साकडे

कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी (Anganewadi) येथील भराडी देवीचे (Bharadi Devi) दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेवून मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.

Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Devi

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले साकडे

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोकण-क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याचीबाब विचाराधीन आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या धरतीवर मुंबई-सिंधुदुर्ग या रस्ते मार्गाचा विकास करण्यात येईल. जेणेकरुन कोकणच्या विकासाला पर्यायाने पर्यटनाला चालना मिळेल.

Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Devi

कोकणच्या सर्वांगिण विकासाकरिता सरकार कटीबध्द असून याकरिता आपण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगत भराडी देवीच्या मान्यवरांनी भक्त निवासाचा प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Deviयावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रात्री १२:३० वाजता आंगणे कुटुंबियाकडून देवीची ओटी भरण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. (Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Devi)

Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Devi

केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या स्थैर्यासाठी आपण भराडी देवीला साकडे घातले असून हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करून आंगणे कुटुंबियांनी भाविकांची काळजी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी