31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रकोकणराज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार 'कामदार' है

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून नितेश राणेंचे कौतुक म्हणाले, यह आमदार ‘कामदार’ है

महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे स‍िंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी स‍िंधुदुर्ग मधील माणसांचे भरभरुन कौतुक केले. व्यासपीठावरील उपस्थ‍ितांचा उल्लेख करतांना त्यांनी युवा आमदार नितेश राणे हे आमदारच नाही 'कामदार' आहेत असा उल्लेख केला. भगतसिंह कोश्यारींना नितेश राणे हे चांगले काम करतात हे सुचवाचये होते. मागच्या महिन्यात भगसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मराठी माणसांचा अपमान केला होता. त्यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) त्यांच्या मदतीला धावून आले होते. बाकी इतर नेत्यांनी त्यांची चुक दाखवून दिली होती. त्यामुळेच आज त्यांनी राणेंच्या पुत्राचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल (Governor) भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे स‍िंधुदुर्ग दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी स‍िंधुदुर्ग मधील माणसांचे भरभरुन कौतुक केले. व्यासपीठावरील उपस्थ‍ितांचा उल्लेख करतांना त्यांनी युवा आमदार नितेश राणे हे आमदारच नाही ‘कामदार’ आहेत असा उल्लेख केला. भगतसिंह कोश्यारींना नितेश राणे हे चांगले काम करतात हे सुचवाचये होते. मागच्या महिन्यात भगसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात मराठी माणसांचा अपमान केला होता. त्यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) त्यांच्या मदतीला धावून आले होते. बाकी इतर नेत्यांनी त्यांची चुक दाखवून दिली होती. त्यामुळेच आज त्यांनी राणेंच्या पुत्राचे कौतुक केले.

आज महाराष्ट्रही शैक्षण‍िक राजधानी म्हणून उदयास यावी असा उल्लेख देखील त्यांनी केला. मुंबई विद्यापिठांतर्गत (Mumbai University) कणकवली तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्याचे उद्धाटन भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. ते मुंबई विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षण‍िक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग ज‍िल्हा हा निसर्ग संपन्न, सुंदर प्रदेश असून, त्याला आपण सर्वांनी मिळून सुंदरतम बनवूया असे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्रराज्य अग्रगण्य बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात क्रांत‍िकारी बदल करावे लागतील. आपण सर्वांनी प्रयत्न करुया असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष‍ चंद्रशेखर बावनकुळे 30 ऑगस्टला मुंबईत कार्यकर्त्यांना भेटणार

राणीची बाग : 200 वर्षे जुने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान गणेश चतुर्थीला खुले राहणार

Jayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील

भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा महाराष्ट्राविषयी बोलतांना नेहमी तोल ढासळतो. यापूर्वी त्यांनी मराठी माणसा विषयी तसेच छत्रपती शिवाजी महाराज तसेच सावित्री बाई फुलें‍ (Savitri Bai Fule) विषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या प्रत्येक वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्र पेटून उठला होता. त्यांच्या विषयी निदर्शने करावी लागली होती. मराठी जनता पेटून उठली की मग ते माफी मागतात. पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमांत काही तरी बरळतातच.

आजच्या कार्यक्रमांत महाराष्ट्रात शैक्षण‍िक क्रांती करण्याची गरज आहे असे म्हणाले, यावेळी बोलतांना त्यांना महात्मा ज्योतीबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांचा विसर पडला. भारतात सर्वांत पहिली शैक्षण‍िक क्रांती महाराष्ट्रात झाली. या विषयी त्यांना माहित नाही. महाराष्ट्राच्या जनतेचे नशीब त्यांनी यावेळी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नाही.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी