कोकणातील (Konkan) भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील (Anganewadi shrines) श्री भराडीदेवी मंदिर परिसरात मोठ्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. (road and mobile connectivity) दरवर्षी या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात मात्र रस्ते आणि मोबाईल नेटवर्क नसल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रयत्नांमुळे येथे रस्ते आणि मोबाईल कनेक्टिव्हीटी उपलब्ध करुन दिल्याने भाविकांची मोठी सोय होणार आहे. येथे मोबाईल फोनला रेंज मिळत नसल्याने भाविकांना फोन करण्यास, तसेच यात्रेचे व्हिडीओ काढणे, फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यास अडचणी येत होत्या. आता मोबईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन दिल्याने यात्रेचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा आनंद भाविकांना मिळणार आहे. (Konkan Anganewadi shrines to Facilitation of road and mobile connectivity)
येथील संपूर्ण रस्त्यांच्या डांबरीकरण व बळकटीकरणाचे काम आता पूर्ण झाले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या मार्गावरील सर्व रस्त्यांचा यंदा कायापालट करण्यात आला आहे. तसेच, गेली अनेक वर्षे मोबाईल नेटवर्किंगची समस्या सोडविण्यात आली असून आंगणेवाडी परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार असल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लोखा चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेली अनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे.
हे सुद्धा वाचा
महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या चर्चेवर कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे मोठे विधान
पृथ्वीराज चव्हाणांनी अर्थसंकल्पाचे केले अभ्यासपूर्ण विश्लेषण !
त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल व्हॅन देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे, आंगणेवाडी यात्रेकरिता येणाऱ्या लाखो भाविकांना यंदा “नो-नेटवर्क” असलेल्या या परिसरात आता मोबाईल नेटवर्कची सुलभता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, आंगणेवाडी साठी येणाऱ्या भाविकांना यात्रेचे फोटो, व्हीडीओ काढण्याचा आनंद मिळणार आहे, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.