29 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरमहाराष्ट्रकोकणम्हाडा: घराची 50 टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ द्या; बाळकुम...

म्हाडा: घराची 50 टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ द्या; बाळकुम प्रकल्पातील लाभार्थ्यांची मागणी

म्हाडा कोकण मंडळाच्या बाळकुममधील वाहनतळाचे काम संथ गतीने सुरू असून, १९४ घरांना मार्चपर्यंत निवासी दाखला मिळणे अशक्य आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या बाळकुम प्रकल्पातील वाहनतळाचे बांधकाम संथ गतीने सुरू असून मार्चपर्यंत या प्रकल्पातील १९४ घरांचे भोगवटा प्रमाणपत्र मिळणे अशक्य आहे. त्यामुळे बाळकुमच्या 194 पात्र विजेत्यांनी/लाभार्थ्यांनी कोकण मंडळाकडे घरांच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम भरण्याची अंतिम मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवण्याची विनंती केली आहे. (MHADA: Give extension of two months to pay 50 percent of house, demand of beneficiaries of Balkum project)

कोकण मंडळाच्या 2018 च्या लॉटरीत बाळकुम प्रकल्पातील 125 घरांची सोडत काढण्यात आली. कोकण मंडळाच्या सन 2000 मध्ये रखडलेल्या प्रकल्पाच्या या योजनेत लाभार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. मात्र बाळकुममध्ये 194 घरे बांधण्यात आली असून या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. ठाणे महानगरपालिकेच्या निर्देशानुसार प्रकल्पात आवश्यक तितकी वाहनतळाची सोय करून देणे गरजेचे ाहे. त्यामुळे  मंडळाने येथे १७ मजली तीन वाहनतळे बांधण्यात येत आहेत. याअनुषंगाने मार्च २०२३ पर्यंत वाहनतळांचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर निवासी दाखला मिळेल असा दावा मंडळाकडून करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी मंडळाने १९४ जणांना देकार पत्र पाठविली आणि घराची रक्कम चार टप्प्यात भरून घेण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा : म्हाडा : मुंबईत तब्ब्ल पाच वर्षांनंतर ४ हजार घरांची सोडत निघणार

म्हाडामार्फत एनटीसी मिलवरील ११ चाळींचा होणार पुनर्विकास

Mhada House Mumbai : मुंबईत म्हाडाचे 22 लाखांत मिळणार स्वप्नातील घर

घराची रक्कम भरून घेताना मंडळाने घराच्या किमतीत थेट १६ लाख रुपयांनी वाढ केली. वाहनतळासह इतर खर्चापोटी ही रक्कम वाढवली. याला १९४ पात्र विजेते/लाभार्थ्यांनी विरोध केला. हा निर्णय मागे घेण्याची मागणी मंडळाने फेटाळली. शेवटी हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. १६ लाखांची वाढ रद्द करण्याची विनंती करण्यात आली असून सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, पात्र विजेते / लाभार्थ्यांनी २५ टक्के रक्कम भरली असून आता ३१ जानेवारीपर्यंत त्यांना ५० टक्के म्हणजेच ३० लाख रुपये भरायचे आहेत. पण मार्चपर्यंत ताबा मिळणार नसल्याने ही रक्कम भरून आम्ही गृहकर्जाच्या समान मासिक हप्त्याचा भुर्दंड का ओढावून घ्यायचा, असा आक्षेप घेत पात्र विजेत्यांनी आणि लाभार्थ्यांनी ५० टक्के रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

आठवड्याभरात रक्कम भरण्याची मुदत संपुष्टात येणार आहे. असे असताना मंडळाने या मागणीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती एका पात्र विजेत्याने दिली. याविषयी कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी एम. आर. मोरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे सांगितले. म्हाडा उपाध्यक्षांकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यांनी मंजुरी दित्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी