29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNilesh Rane : निलेश राणे म्हणाले, हात जोडून माफी मागतो

Nilesh Rane : निलेश राणे म्हणाले, हात जोडून माफी मागतो

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. याबाबत आता बारसू येथील जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. परंतु याला स्थानिक ग्रामस्थांकडून याला विरोध दर्शवण्यात येत आहे.

रत्नागिरीतील रिफायनरीचा वाद पुन्हा पेटला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांचा तीव्र संताप आणि विरोध सध्या वारंवार पाहायला मिळत आहे. याच वादाचा फटका आता भाजप नेते निलेश राणे यांना बसला असून जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले आहे. रिफायनरी सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी निघालेल्या निलेश राणे यांच्या ताफ्याला रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी अडवले आणि राणे समर्थकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करीत तीव्र संताप व्यक्त केला. त्यावेळी निलेश राणे यांनी तात्काळ माफी मागत हा विषय आणखी चिघळू देऊ नका,चर्चेने मार्ग निघू शकतो अशी विनंती केली.

भाजप नेते निलेश राणे राजापूर तालुक्यातील बारसू इथल्या माळरानावर सुरु असलेल्या रिफानरी सर्वेक्षणासंदर्भात आढावा घेण्यासाठी पोहोचले. सध्या बारसू येथे सर्वेक्षणाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शवण्यात येत आहे, त्यामुळे या सर्वच बाबतीत जाणून घेण्यासाठी राणे बारसू गावी पोहोचले परंतु येथे रिफायनरी विरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांनी निलेश राणे यांचा ताफाच अडवला आणि त्यावेळी तक्रारीचे सूर उमटू लागले. यावेळी राणे समर्थकांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, मवाळ भूमिका स्विकारत निलेश राणे यांनी ग्रामस्थांची माफी मागितली.

हे सुद्धा वाचा…

tomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

Virushka Scooter Ride : अनुष्का शर्मा आणि विराटची कोहलीची ‘स्कूटर राईड’ला पसंती

Eknath Shinde : सरकार कधी पडणार, एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्ट उत्तर

यावेळी निलेश राणे म्हणाले, आपण जो विरोध करत आहात यातून लोकशाही मार्गाने मार्ग काढावा लागेल. मात्र, तुम्ही जो शिवीगाळ केल्याचा आरोप करत आहात, जर कोणी तुम्हाला शिविगाळ केली असेल, तर मी तुमची हात जोडून माफी मागतो. तसेच आमच्या लोकांना समज देतो. तुम्ही आमची माणसं आहात. तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीत. मात्र, चर्चेने मार्ग निघू शकतो. त्यामुळे कृपा करून हा विषय चिघळू देऊ नका, शांत व्हा”, असे राणे यावेळी म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले आहे. याबाबत आता बारसू येथील जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. परंतु याला स्थानिक ग्रामस्थांकडून याला विरोध दर्शवण्यात येत आहे. जेव्हा संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निलेश राणे यांच्या गाडीचा ताफा गावात आला त्यावेळी तेथील महिलांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन करत कोणत्याही परिस्थितीत हे सर्वेक्षण करू देणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यान, नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंकडून या रिफायनरीचे समर्थन का? असा सवाल सुद्धा निलेश राणे यांना ग्रामस्थांकडून विचारण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी