30 C
Mumbai
Friday, May 12, 2023
घरमहाराष्ट्रकोकण किनारपट्टीला उन्हाच्या झळा; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीला उन्हाच्या झळा; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

सतत बदलणाऱ्या हवामान ऋतुमुळे नागरिक हैराण झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी मुसळधार अशा वातावरणामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे सुद्धा हाल होत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. याचा मानवी आरोग्य आणि शेतीवर देखील गंभीर परिणाम दिसून आला. त्यानंतर भारत हवामान विभाग (India Meteorological Department)ने आज आणि उद्या म्हणजेच ता.9 मार्च ते 10 मार्च रोजी कोकण किनारपट्टीलगत गोवा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण विभागासह गोव्यातील तापमान 2 ते 3 अंशाने वाढणार असून, येथील हवामानात उष्णता जाणवणार आहे. तर मध्य भारत आणि संपूर्ण राज्यात पुढचे दोन दिवस 4 ते 6 अंशाने तापमानात वाढणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान करण्यात येते. (Konkan coastlines heat)

उन्हाचा त्रास जाणवल्यास काय कराल?

  • नाकातून रक्त आल्यास डोक्यावर पाणी मारावे.
  • ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो, अशा व्यक्तींनी अंघोळ झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटे ओल्या अंगानेच रहावे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
  • रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपावे. चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.
    तेलकट, मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावे.
  • उष्णतेमुळे तोंड आल्यास कच्ची तोंडली खावी. तसंच साजूक तूप लावावे आणि सर्वात महत्त्वाचं पोट स्वच्छ ठेवावं.
    लघवीला जळजळ होत असल्याचं सब्जा घातलेलं पाणी प्यावं.

हे सुद्धा वाचा : 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी आज ठाण्यात होणार ‘राजगर्जना’

महाराष्ट्र बजेट 2023: शिंदे-फडणवीस सरकारचं आज पहिलं बजेट; घोषणांचा वर्षाव होणार?

नागपूरात आजपासून कलम 144 लागू ; वाचा काय आहेत नियम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी