33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रउपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

टीम लय भारी

सातारा : ‘माणदेशी एक्स्प्रेस’ या नावाने आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरची ओळख आहे. विद्युतवेगाने धावणाऱ्या या कन्येने भारताची मान जगभरात उंचावली. आता ती उपजिल्हाधिकारी म्हणून सरकारी सेवेत दाखल झाली आहे. प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणानिमित्ताने ती एका खेडेगावात गेली असताना शेतात जाऊन तिने ऊस व हरभऱ्याचा आस्वाद घेतला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतही तिने यावेळी संवाद साधला.

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची (एमपीएससी) परीक्षा यशस्वी झालेल्या ९५ प्रशिक्षार्थी अधिकाऱ्यांनी निढळ या गावाला नुकतीच भेट दिली. या ९५ अधिकाऱ्यांमध्ये ललिता बाबर हिचाही समावेश होता. निढळच्या (ता. खटाव) लगतच पांढरवाडी (ता. माण) या गावाची हद्द आहे. निढळप्रमाणेच पांढरवाडीमध्ये सुद्धा जलसंधारणाची मजबूत कामे झाली आहेत. पांढरवाडीमध्येही शेतशिवार फुलले आहे. निढळची पाहणी करत असताना ललिता व अन्य प्रशिक्षार्थींनी पांढरवाडी हद्दीतील ऊस व हरभरा पाहिला. पांढरवाडीच्या शेतकऱ्यांनीही ललिताला लगेच ओळखले. ऑलिम्पीकमध्ये धावताना ललिताला अख्ख्या जगाने पाहिले होते. पांढरवाडीच्या शेतकऱ्यांनीही तिला टिव्हीवर सतत पाहिले होते. त्यामुळे पांढरवाडीच्या शेतकऱ्यांनी तिला सन्मानाने शेतातील रानमेवा दिला. ललिता व तिच्या सहकारी प्रशिक्षणार्थींनी सुद्धा शेतात जाऊन ऊस व हरभऱ्याचा आस्वाद घेतला.

आम्ही शेतात काम करीत होतो. त्यावेळी बसमधून अनेकजण उतरले. त्यातील ललिता बाबरला मी ओळखले. इतकी मोठी व्यक्ती आपल्या शेताजवळ असल्याचे पाहून मला आनंद वाटला. शेतातील ऊस व हरभरा घेऊ शकतो का असे त्यातील एकजणाने मला विचारले. ‘यात विचारण्यासारखे काय आहे. तुम्ही हवं तेवढं घ्या’ असे मी त्या सगळ्यांनाच बोललो. ललितालाही मी शेतात येण्याची विनंती केली. एक आंतरराष्ट्रीय धावपटू असूनही ललिता आमच्या शेतात आली याचाच मला फार आनंद वाटला. ललिता फार मोठी व्यक्ती असूनही नम्र वाटली.

संदीप सूर्यवंशी, युवा शेतकरी

ललिताचे पतीही आहेत सनदी अधिकारी

ललिता बाबर नुकतीच प्रशासकीय सेवेत रुजू झाली आहे. पण तिचे पतीसुद्धा सनदी अधिकारी आहेत. संदीप भोसले असे त्यांचे नाव आहे. आटपाडी तालुक्यात (जि. सांगली) त्यांचे गाव आहे. ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण करून ते ‘भारतीय महसूल सेवे’त (आयआरएस) ते कार्यरत आहेत. सध्या मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या जीएसटी खात्यात ते उच्च पदावर काम करतात.

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद
जाहिरात

अत्यंत गरीबीतून ललिताने घेतली आहे भरारी

ललिता व तिचे पती प्रशासकीय सेवेत आहेत. त्यामुळे कुणालाही वाटेल की ते गर्भश्रीमंत असतील. वस्तुत: ललिताने अत्यंत गरीबीतून उंच भरारी घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील मार्डी (ता. माण) या गावची ती रहिवाशी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत ती शिकली आहे. शिक्षण घेत असताना तिच्याकडे धावण्यासाठी प्रचंड वेग आहे असे तिच्या शिक्षकांच्या लक्षात आले. त्यावर शिक्षकांनी तिला प्रशिक्षण दिले. तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, देश आणि त्यानंतर जग अशा पातळीवर ललिता वेगाने धावली. देशासाठी व महाराष्ट्रासाठी तिने मुबलक मेडल्स आणली. भारत सरकारने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिची निवड केली तेव्हा तिच्याकडे कसलेच पैसे नव्हते. त्यावेळी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र सरकारकडून तिला त्यांनी आर्थिक मदत मिळवून दिली. तसेच माण तालुक्यात जंगी ‘माणदेशी मॅरेथॉन’ आयोजित करून तिला प्रोत्साहन दिले होते. निधीही मिळवून दिला होता. त्यानंतर प्रभाकर देशमुख यांनीच सनदी अधिकारी संदीप भोसले यांच्यासोबत ललिताचा विवाह जुळवून आणला.

प्रशिक्षाणार्थींमध्ये ललिता बाबर हिचा समावेश होता. ही आंतरराष्ट्रीय धावपटू आमच्या निढळ गावात आली याचे मलाही फार कौतुक वाटले. क्रीडा क्षेत्रात तिने उंच भरारी घेतली, तशीच ती आता प्रशासकीय सेवेतही चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास वाटतो.

चंद्रकात दळवी, निवृत्त सनदी अधिकारी

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

हे सुद्धा वाचा

VIDEO : बेरोजगार युवक, महिलांसाठी मधमाशीपालन उद्योग, सरकार देणार अनुदान

VIDEO : अधिकाऱ्यांच्या बदल्या सूडभावनेने नकोत : भाजपने ठणकावले

VIDEO : शाळकरी मुलांना अभियांत्रिकीची तोंड ओळख; राज्य सरकारचा ‘लय भारी’ उपक्रम !

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी