28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला नेते एकनाथ खडसे यांच्या हटके शुभेच्छा

टीम लय भारी

जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस, त्यामुळे सोशल मीडिया वाढदिवसाच्या शुभेच्छांनी दणाणून गेले आहे. राज्यासह देशभरातून भाजप आणि इतर पक्षांकडून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान फडणवीसांचे राजकीय वैरी म्हणून गणल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

राजकारणात कितीही वैर असले तरीही वाढदिवसाच्या दिवशी मात्र अगदी दिलखुलासपणे एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. जळगावचे राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा राजकीय राग बाजूला ठेवत देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पोस्टर पोस्ट करून त्यात शुभेच्छा संदेश लिहून ट्विटरवर पोस्ट केले आहे.

ट्विटमध्ये एकनाथ खडसे म्हणतात, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले… हार्दिक अभिष्टचिंतन असे म्हणून त्यांनी देवेंद फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ED चे मालक.. असे म्हणून शुभेच्छातून टीका केली आहे आहे, त्यामुळे सोशलमीडियावर सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आज चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आज विरोधीपक्षनेते अजित पवार यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा एकनाथ खडसे यांनी “महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks दादा, आज आपला जन्मदिवस. त्यानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन!” असे म्हणत अशा काहीशा सारख्याच शुभेच्छा दिल्या आहेत.

दरवर्षी फडणवीस आणि पवार यांचे वाढदिवस एकत्र येत असल्याने बऱ्यातदा शहरांत पोस्टर वाॅर रंगलेले पाहायला मिळत मिळते, परंतु यंदा वाढदिवस कोणताच गाजावाजा न करता साजरा करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे, त्यामुळे यंदा काहीसे वेगळे वातावरण पाहायला मिळणार आहे.

वाढदिवसाचा गाजावाजा करण्याऐवजी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत हा वाढदिवस साजरा करण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ठरवल्यामुळे हा अनोखा विचार कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे सुद्धा वाचा…

द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती’ पदावर विराजमान

VIDEO : शिंदे सरकारचा ‘आरे’वर घाव!

आमदारांना फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!