33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमहाराष्ट्रकसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपली सर्व ताकद पणाला लावूनही महविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारली. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात माविआचा उमेदवार निवडून आल्यामुळे विरोधकांचे मनोबल वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. एका मतदारसंघाची निवडणूक राज्याची निवडणूक होत नाही.” पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मात्र पिंपरी-चिंचवड मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे दोनपैकी एक गड राखण्यात भाजपाला यश आले आहे.

पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाने आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावूनही अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. महविकासआघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा तब्बल ११ हजार ०४० इतक्या मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी पराभव केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना विरोधकांवर निधन साधला आहे. ते म्हणाले, “पोटनिवडणुकांचं गणित वेगळं असतं आणि सार्वत्रिक निवडणुकांचं गणित वेगळं असतं. त्यामुळे एका विजयाने एवढं हुरळून जाण्याची गरज नाही. एका मतदारसंघाची निवडणूक राज्याची निवडणूक होत नाही. त्यांना आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.” (Let them celebrate their victory)

कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे सुद्धा मनापासून आभार. त्यांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत आहोत. पुढील निवडणुकीत अधिक प्रयत्न करु आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींची मनं आम्ही नक्की जिंकू,याची खात्री बाळगतो, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकांकडेही विरोधकांनी पहिले पाहिजे. ७५०० ग्रामपंचायतींपैकी ४५०० ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपाचे सरपंच झाले. हे कशाचं उदाहरण आहे? कसबा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.”

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

TAIT Exam : परीक्षेपासून वंचित ठेवलेल्या विवाहित महिला उमेदवाराला परीक्षा देता येणार; उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश

फडणवीसांचे नव्याने ‘पुन्हा येऊ’!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी