30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र‘चला एक झाड लावू या‘ -धनंजय मुंडे

‘चला एक झाड लावू या‘ -धनंजय मुंडे

टीम लय भारी

परळीः राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा 15 जुलैला वाढदिवस असतो. आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आहे. या दिवशी त्यांनी एक झाड लावण्याचा आग्रह आपल्या हितचिंतकांना केला आहे. त्यांनी व्टिटरवर हा मॅसेज पाठवला आहे.या दिवशी हार, तुरे, बॅनर्सवर होणारा खर्च टाळून त्याऐवजी झाडे लावावीत व त्यांचे संवर्धन करावे. तसेच त्या लावलेल्या झाडाचा सेल्फी पाठवावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी समर्थकांना केले आहे.

धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात पावसाने प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे वृक्षारोपण करण्यावर त्यांचा भर आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात चांगला पाऊस पडला आहे. मात्र तरीही आपल्या भागात वृक्षारोपण करण्याची तसेच संवर्धन करण्याची गरज आहे असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. ज्याने झाड लावले आहे. त्याने झाडा सोबत एक सेल्फी काढून न विसरता मला पाठवा. पुढच्या वर्षी हे झाड मोठे होईल, तेव्हा पुन्हा फोटो पाठवायचा. हे सत्र असेच सुरु राहिल. या वाढदिवसाची हीच खरी भेट मला अपेक्षित आहे. ‘चला एक झाड लावू या‘ हा उपक्रम त्यांच्या हितचिंतकांना नक्कीच आवडणारा आहे.

हे सुध्दा वाचा:

खुशखबर ! आता दिवसा मिळणार शेतीला पाणी

VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती

‘सुशांत सिंह’ मृत्यू प्रकरणी ‘रिया’ला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी