29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रLohi Gram Panchayat : लोही ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

Lohi Gram Panchayat : लोही ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

यवतमाळ जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीकडून याबाबत विशेष खबरदारी घेत गावकऱ्यांना आवाहन करणारा एक विशेष फलक गावात लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून आदेश जारी करणारे वेगवेगळे फलक आजपर्यंत आपण पाहिले असतील, वाचले असतील. पण जीवनात मोलाचा संदेश देणारा हा फलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बहुतेक वेळा कोणतीही शहानिशा न करता बोलल्या गेलेल्या गोष्टींमुळे अनेक अनर्थ घडले असल्याचे आजवर अनेकदा कानावर आलेले आहे. शहानिशा न करता बोलल्या गेलेल्या गोष्टींमुळे अनेक गैरसमज देखील निर्माण होतात आणि याच गोष्टीचा आपल्या जीवनावर देखील परिणाम होतो. याचा अनुभव आजपर्यंत अनेक लोकांना आला असेल. त्याचमुळे यवतमाळ जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीकडून याबाबत विशेष खबरदारी घेत गावकऱ्यांना आवाहन करणारा एक विशेष फलक गावात लावण्यात आला आहे. ग्रामपंचायतीकडून आदेश जारी करणारे वेगवेगळे फलक आजपर्यंत आपण पाहिले असतील, वाचले असतील. पण जीवनात मोलाचा संदेश देणारा हा फलक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर अनेक लोक एकमेकांना हा फलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर देखील करत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या लोही ग्रामपंचायतीकडून एक फलक लोही गावात लावण्यात आलेला आहे. या फलकावर त्यांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता कोणाकडे काहीही बोलू नका असे गावकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. गावा-खेड्यात अनेक वेळा गैरसमजामधून अनेक मोठमोठे वादविवाद झालेले पाहायला मिळतात. हे वादविवाद इतक्या टोकाला जातात की ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये हाणामारी देखील होतात. याच गोष्टी टाळण्यासाठी लोही ग्रामपंचायतीकडून हा महत्वपूर्ण संदेश देणारा फलक लावण्यात आला आहे.

हल्लीच्या व्यस्त जीवनामुळे लोकांमधील संवाद कमी होऊ लागले आहेत. याचमुळे एकमेकांमधील गैरसमज देखील वाढू लागले आहेत. एखाद्या व्यक्तीबाबत गैरसमज वाढलेले असताना त्या व्यक्तीबद्दल चीड निर्माण होणे, हे आता बहुतेक लोकांच्या स्वभावात दिसून येऊ लागले आहे. त्याचमुळे द्वेष, रागाची भावना निर्माण झाल्याने आपापसांत बोलताना देखील कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता बोलले जाते.

Lay Bhari Diwali Magzine : ‘लय भारी’चा दिवाळी अंक राजकारण्यांसाठी ‘अभ्यास पुस्तक’, मुख्यमंत्र्यांनी दिवाळी अंकाचे केले प्रकाशन

Jitendra Awhad : कायदा हातात घेणं माझा जनसिद्ध हक्क : जितेंद्र आव्हाड

IND vs PAK : भारत-पाक सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

परिणामी, कोण काय बोलतंय.. किंवा जे काही आपण ऐकतो अथवा आपल्याला के जे काही सांगण्यात येते ते खरंच सत्य आहे का ? याची कोणीच शहानिशा करत नाही आणि ज्यामुळे एकाकडून काही तरी ऐकून त्याबाबत गैरसमज निर्माण केला जातो. अशा गोष्टी टाळण्यासाठीच लोही ग्रामपंचायतीने गावात गैरसमज होऊ नयेत या अनुषंगाने हा फलक गावात लावला आहे.

एकंदरीतच, हा फलक लोही ग्रामपंचायतीकडून लावण्यात आला असला तरी सोशल मीडियावर हा मात्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तर लोही ग्रामपंचायतीने लावलेल्या या आशयपूर्ण आणि हल्लीच्या जीवनात महत्वाच्या असलेल्या गोष्टीवर प्रकाश टाकल्याने लोही ग्रामपणाच्यातीचे कौतुक देखील करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी