34 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमहाराष्ट्रवसूलीपायी प्रकल्प घालवले; उद्धव ठाकरेंवर शितल म्हात्रे यांचा आरोप

वसूलीपायी प्रकल्प घालवले; उद्धव ठाकरेंवर शितल म्हात्रे यांचा आरोप

वेदांता-फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअर बस सारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअर बस सारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. शितल म्हात्रे यांनी एक ट्विट केले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, ” उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा, कंपन्यांना ना दिली जागा, ना केला करार… वसूलीपायी प्रकल्प घालवून उलटा हाहाकार”

शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वसूलीचा आरोप केला आहे, वसूलीपायी ठाकरे यांनी राज्यातील प्रकल्प घालवल्याचा आरोप करुन उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाट्यासाठी महाराष्ट्राचा घाटा केल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (30 ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या प्रकल्प २२ हजार कोटींचा असून तो नागपूर येथे होणार होता. या प्रकल्पातून राज्यात मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती देखील होणार होती. नागपूरमध्ये हा प्रकल्प व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे मागे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले होते. मात्र अचनाकपणे टाटा एअरबसचा हा मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.

शिवसेसनेने देखील राज्यसरकार आणि मुख्यमंत्री, उपमुख्यांवर टीकेची झोड उठवली. शिवसेनेतील अनेक नेत्यांनी सरकारवर आरोप केले. तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादीने देखील राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी देखील मागील सरकार असताना त्यांनीच उद्योगांसाठी प्रयत्न न केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला.
हे सुद्धा वाचा :

खोक्यांचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून झाल्याचे दिसते; एकनाथ खडसे यांचा आरोप

मंत्री गुलाबराव पाटील भडकले; रवी राणांना खडे बोल सुनावले!

Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

त्यातच आता शितल म्हात्रे यांनी देखील ट्विट करून थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य बनवत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यामुळे राज्यातील कंपन्या बाहेरच्या राज्यात जाण्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत असेच त्यांनी या ट्विटव्दारे सुचवले आहे. यात त्यांनी ठाकरेंवर वसूलीचा गंभीर आरोप देखील केला आहे.

शितल म्हात्रे या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुंबई बाहेर ठाण्यात अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले मात्र मुंबईतून शितल म्हात्रे यांनी पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात प्रवेश केला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!